Tarun Bharat

केवळ भाजपच्या लोकांचे उत्पन्न वाढले, जनतेचे नाही: कपिल सिब्बल

नवी दिल्ली /प्रतिनिधी

मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री महेंद्रसिंह सिसौदिया यांनी वाढत्या महागाईबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापलं आहे. यावर काँग्रेसकडून आता पलटवार देखील करण्यात आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले की, केवळ भाजपाच्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे, सर्वसामान्य जनतेचे नाही.

दरम्यान सिब्बल यांनी मंत्री महेंद्रसिंह सिसौदिया यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना मध्यप्रदेशचे मंत्री म्हणतात, लोकांचे उत्पन्न वाढले आहे, त्यामुळे त्यांनी वाढत्या किंमतींना देखील स्वीकारलं पाहीजे. मात्र खर तर हे आहे की फक्त भाजपच्या लोकांचे उत्पन्न वाढले. इंधन, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. ते गरिबांबद्दल नाही विचार करत. मला आशा आहे की लोक या सरकारला उखडून फेकतील आणि याची सुरूवात उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाने होणार आहे.”असे ते म्हणाले.

मध्य प्रदेश सरकारचे मंत्री महेंद्र सिहं यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना जेव्हा म्हटले की, उत्पन्न वाढत आहे तर लोकांनी महागाईचा देखील स्वीकर केला पाहीजे. त्यांनी हे देखील म्हटलं की सरकार नागरिकांना प्रत्येक वस्तू मोफत नाही देऊ शकत. तर, पेट्रोलियम पदार्थांवरील कराबाबत बाजू मांडताना त्यांनी सांगितले की, यातून सरकारला महसूल मिळतो, जो शेवटी विकार आणि जनहीतच्या सरकारी योजनांसाठी कामी येतो.

Related Stories

सीपीएम नेता सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनाने निधन

Tousif Mujawar

मध्यप्रदेश : 400 बनावट ‘रेमडेसिवीर’सह एकाला अटक

datta jadhav

लवकरच गुजरातपेक्षा मोठा प्लांट महाराष्ट्रात आणणार; वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवालांची माहिती

Archana Banage

भारत-नेपाळ संयुक्त सराव सोमवारपासून

Patil_p

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; विटा पोलिसांची कारवाई

Abhijeet Khandekar

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Archana Banage