Tarun Bharat

केवळ 40 जणांनाच विवाहासाठी परवानगी

लग्न-इतर समारंभांसाठी निर्बंध कायम  : तहसीलदार कार्यालयातून माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक जारी करण्यात आला असला तरी विवाहासाठी केवळ 40 जणांना परवानगी देण्यात येणार आहे. विवाह समारंभांसाठी असणारे नियम अनलॉकमध्येही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधितांना तहसीलदार कार्यालयातून केवळ 40 जणांना परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विवाहासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून संबंधितांना विवाह कार्य करावे लागणार आहे. शिवाय लग्न करण्यास घरामध्ये परवानगी दिली असून घर सोडून मंदिर, मंगल कार्यालय, हॉटेल व इतर ठिकाणी लग्न करण्यास परवानगी नाकारली जात आहे. लग्नाबरोबरच धार्मिक कार्यक्रम, गृहप्रवेश व इतर कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक आहे. अर्ज दाखल केलेल्या मंडळींना अर्जाची पाहणी करून एक-दोन दिवसात संमतीपत्र देण्यात येत आहे.

मागील महिन्यात तहसीलदार कार्यालयातून रितसर परवानगी घेऊन 1930 जण विवाहबद्ध झाले आहेत. दरम्यान, विवाहाच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात दररोज संबंधितांची वर्दळ सुरू आहे. या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना विवाह सोहळय़ांसाठी परवानगी दिली जात आहे. दरवषी एप्रिल, मे व जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात लग्नसोहळे संपन्न होतात. मात्र, मागील वर्षापासून लग्नसराईच्या हंगामातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विवाहकार्य व इतर कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. शिवाय धार्मिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक आहे.

Related Stories

आधारकार्ड दुरुस्ती कामाला वेग

Amit Kulkarni

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते

Rohit Salunke

भारतीय उत्सवाचे जतन केल्यास संस्कृती अबाधित

Amit Kulkarni

प्राणीदया संघटनेची भूतदया, नागरिकांची गयावया

Omkar B

आर.व्ही.देशपांडे यांच्याकडून प्रचाराचा धडाका

Amit Kulkarni

कुडची येथील आणखी तिघांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar