Tarun Bharat

केशरी कार्ड धारकांना मिळणार एक मे पासून धान्य

सातारा प्रतिनिधी –

 कोरोना पार्श्वभूमी वर सरकार मार्फत गरीब गरजू लोकांना मोफत धान्य रेशन दुकान मार्फत होत आहे, परंतु ज्या लोकांना कडे केशरी कार्ड आहे मात्र त्याचे 

डिजिटल नोंदी झाले नाही त्या मुळे त्यांना या सरकारी योजनेचा लाभ घेता आलेला नाही अश्या सर्व कार्ड धारकांना येत्या एक मे पासून त्यांचा रेशन दुकानामध्ये गहू व तांदूळ उपलब्ध होणार आहे अशी माहिती सातारा नायब तहसीलदार पुरवठा, श्री रमेश उलागडी यांनी दिली

शासनामार्फत या वंचित लोकं साठी धान्य सातारा येथील गोडाऊन मध्ये पोहचले असून हे धान्य तालुक्यातील सर्व स्वस्थ धान्य दुकानदार. पर्यंत पोहचविन्या साठी काम सुरू असून तीस एप्रिल पर्यंत हे धान्य तालुक्यातील 218 पोहच होईल व एक मे पासून याचे वाटप सुरू होईल, ज्या केसरी कार्ड धरकांचे नोंदी रेशन दुकानात आहेत व त्या नोंदी सरकारी कार्यालय कडे पोहच झालेत अश्याच कुटुंबाचे धान्य सरकार मार्फत देण्यात येणार आहेत,ज्यांचा नोंदी नाही अश्या कार्ड धारकांना याचा फायदा मिळणार नाही,या योजनेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस तीन किलो गहू आठ रुपये प्रमाणे तर दोन किलो तांदूळ बारा रुपये प्रमाणे देण्यात येणार असून प्राधान्याने या लोकांनाच वाटप एक ते दहा मे पर्यंत केले जाईल व त्या नंतर बी पी एल योजनेचे रेगुलर व मोफत चे वाटप करण्यात येईल

Related Stories

शिवाजी पार्क म्हटलं की…; दसरा मेळाव्यावर शरद पवारांचं मोठं विधान

Archana Banage

सचिन वाझेंची विशेष एनआयए कोर्टात धाव ; केल्या ‘या’ तीन मागण्या

Archana Banage

कुरुंदवाड ९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

Archana Banage

शिल्लक चिंध्यापासून मास्क तयार करून त्यांचे मोफत वाटप

Patil_p

अनिल परबांच्या कारवाईवर संजय राऊतांचा इशारा

Archana Banage

विजेची तार अंगावर पडल्याने चार शेळ्या जागीच ठार

Archana Banage