Tarun Bharat

केस घाला, पण ड्रेनेजचं पाणी मनपा अधिकाऱ्यांच्या तोंडवर ओतणार

Advertisements

महापालिकेच्या कारभाराचा केला पंचनामा, नागरिकांत संतापाची लाट

प्रतिनिधी / मिरज

ड्रेनेज सांडपाण्याच्या दुर्गंधीने श्वास गुदमरलाय, घरात बहिणीला डेंग्यू झालाय, मोठ्या डासांनी झोप उडवलीय आणि दुर्गंधीने स्वतः च्याच घरात जगणं हराम झालंय. मात्र, महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांना रस्ता कामाचे उद्घाटन महत्वाचे वाटले. इथे नागरिक नरकयातना भोगत असताना शिवाय वारंवार तक्रारी करूनही ड्रेनेज गळती थांबविण्यासाठी महापालिका सरसावली नाही. या सगळ्या प्रकाराला संतापलेल्या श्रीपाद आचार्य या नागरिकाने शनिवारी सकाळी भर रस्त्यात उभारून जोरजोरात आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त केल्या. घरात शिरलेल्या ड्रेनेच्या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल करून महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा केला.
मिरज शहराचं वैभव समजलं जाण्याऱ्या मुख्य रेल्वे स्टेशन चौकात गेली महिनाभर तीन ठिकाणी सुरू असलेली ड्रेनेज गळती थांबविण्यास महापालिका प्रशासन सपशेल निष्क्रिय ठरले आहे. नगरसेवक टक्केवारीसाठी ट्रीमिक्स रस्ता कामाच्या उदघाटनात मशगुल आहेत. मग नागरिकांच्या आरोग्याचा जबाबदारी कुणाची.. महापालिका आमच्याकडून सगळा कर भरून घेते मग सुविधा का देत नाही. आयुक्तांना भेटलो, उपायुक्त मॅडमना भेटलो, आणि कुणाला भेटायचे, सांगा. आम्ही मेल्यानंतर तुम्ही ड्रेनेज गळती थांबवणार का? असा सवालही या नागरिकाने उपस्थित केला.

आपल्या घरातच गटारीचे सांडपाणी शिरल्याचे सांगूनही महापालिका अधिकारी मात्र तोंडाला रुमाल लावून लांब उभारूनच पाहणी करून जातात, असा आरोप या नागरिकाने केला. माझ्या घरात जर रोगाचे थैमान सुरू झाले, माझी माणस आजारी पडली तर महापालिका जबाबदार आहे का, असा सवालही या नागरिकाने उपस्थित केला. माझ्यावर पोलीस केस घातली तरी चालेल, पण ड्रेनेजचे पाणी मनपा अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराच या नागरिकाने दिला.

दरम्यान, सदर नागरिकाने गोंधळ घालण्यास सुरू केल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाची औषध फवारणी गाडी त्याच्या घराजवळ आली. त्यावेळी या नागरिकाने औषध फवारणी करून काय उपयोग. ते औषध तुमच्याच तोंडावर मारा. असे म्हणत संताप व्यक्त केला.

Related Stories

सांगली : बापाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल

Archana Banage

सांगली : विजेचा धक्का लागून शिपुर येथील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

मल्याळम मिशनचा सांगलीत प्रारंभ

Archana Banage

सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात आता खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात – प्रकाश ढंग

Archana Banage

पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून ‘तो’ चढला विजेच्या खांबावर

Archana Banage

सांगली : वसगडे बंधारा ‘ओव्हर फ्लो’

Archana Banage
error: Content is protected !!