फीनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा : अलिम माडिवाले, मदन बेळगावकर सामनावीर पुरस्काराचे मानकरी


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित फीनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी के. आर. शेट्टी किंग्स संघाने बीसीसी मच्छे संघाचा 22 धावांनी तर ऍडव्होकेट पाटील लॉयन संघाने फॅन्को क्रिकेट क्लबचा 4 धावांनी पराभव करत प्रत्येकी 2 गुण मिळविले. अलीम माडिवाले ( के. आर. शेट्टी), मदन बेळगावकर (पाटील लायन्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 129 धावा केल्या.
भरत गाडेकरने 1 षटकार आणि 4 चौकारासह 36, अलीम माडिवालेने 1 षटकार, 2 चौकारासह 25, नंदकुमार मलतवाडकरने 17, अलोक बडगावीने 18 तर प्रशांत लायंदरने 13 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे संदीप चव्हाणने 15 धावात 2, प्रवीण कराडे, विनित अडुळकर, सुनिल नायडू, प्रसाद नाकाडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 7 बाद 107 धावाच केल्या. त्यात प्रसाद नाकाडीने 3 षटकारसह नाबाद 41, विनित अडुरकरने नाबाद 19, संदीप चव्हाणने 15 तर अमित पाटीलने 12 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे नंदकुमार मलतवाडकरने 11 धावात 4, अलीम माडिवालेने 24 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात ऍडव्हेकेट पाटील लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 126 धावा केल्या. मदन बेळगावकरने 1 षटकार 5 चौकारासह 54, सुनिल सक्रीने 23, तर कपिल वाळवेकरने 17 धावा केल्या. फॅन्कोतर्फे विशाल प्रभूने 22 धावात 2, संजू गवळी, अरिफ बाळेकुंद्री, शंकर होसमनी, रोहित पोरवाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना फॅन्को क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 8 बाद 122 धावाच केल्या. त्यात अरिफ बाळेकुंद्रीने 2 चौकारासह 27, सैफुल्ला पिरजादेने 2 चौकारासह 21, विशाल प्रभूने नाबाद 14 तर रोहित पोरवालने 2 षटकारासह 12 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते हर्ष जॉन थॉमस, राहुल जाधव, रोहित पोरवाल यांच्या हस्ते सामनावीर अलीम माडिवाले, इम्पॅक्ट खेळाडू भरत गाडेकर, उत्कृ÷ झेल प्रणय शेट्टी, सर्वाधिक षटकार प्रसाद नाकाडी तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे निलेश देसाई, चंदर कुंदरनाड, ताहीर सराफ यांच्या हस्ते सामनावीर मदन बेळगावकर, इम्पॅक्ट खेळाडू सुनिल सक्री, उत्कृ÷ झेल सुनिल पाटील, सर्वाधिक षटकार रोहित पोरवाल यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
- के आर. शेट्टी किंग्स वि. एस्क्ट्रिम स्पोर्ट्स सकाळी 9 वाजता
- फॅन्को क्रिकेट क्लब वि. विश्रुत स्ट्रायकर्स यांच्यात दुपारी 1.30 वाजता.