Tarun Bharat

‘के. बी. परंपरा’ प्रदर्शनाची सांगता

Advertisements

बेळगाव : येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी कला दालनात भरलेल्या ‘के. बी. परंपरा’ या प्रदर्शनाची सांगता झाली. कलामहषी के. बी. कुलकर्णी यांच्या शतकोत्तर जन्मतिथीनिमित्त 4 फेब्रुवारीपासून 5 दिवस हे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये स्वतः के. बी. कुलकर्णी यांच्याशिवाय रवि परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील, विकास पाटणेकर, संतोष पेडणेकर, किरण हणमशेट, रमेश नाईक, अनघा देशपांडे (सुजाता बेळवी) आणि सुभाष देसाई या सर्वांची मिळून 56 ऑईल व वॉटर कलर पेंटिंग्ज प्रदर्शित करण्यात आली. हजारो रसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.

सांगता समारंभाप्रसंगी बोलताना संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे म्हणाले, चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, उत्तम अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी अशा तऱहेची उत्तमोत्तम प्रदर्शने वरचेवर आयोजित केली जातील. त्याचप्रमाणे कला दालनातर्फे ड्रॉईंग व पेंटींगचे वर्ग सुरू करण्यात येतील. त्याचा रसिकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

सायंकाळी 4 ते 6 या वेळेत वरेरकर नाटय़ संघाच्या प्रांगणात जे. एन. भंडारी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पेंटींगचे प्रात्यक्षिक केले.

Related Stories

कोरोना: कर्नाटकातील १३ जिल्ह्यांमध्ये सोमवारी ७३ रूग्णांचा मृत्यू

Abhijeet Shinde

साहाय्यक उपनिरीक्षकाचा सौंदत्तीजवळ अपघातात मृत्यू

Patil_p

अधिकाऱयांनो, शहराचा फेरफटका एकदा तरी मारा!

Patil_p

रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा

Amit Kulkarni

तांत्रिक विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे : जयानंद मठद

Patil_p

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!