Tarun Bharat

कैदी गिरवताहेत रंगकामाचे धडे

Advertisements

स्वावलंबनासाठी कारागृहाचा पुढाकार : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 50 हून अधिक कैद्यांना रंगकामाचे प्रशिक्षण

प्रतिनिधी /बेळगाव

वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणात कारावास भोगणाऱया कैद्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कारागृह प्रशासनाने कार्यक्रम हाती घेतला आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील सुमारे 50 हून अधिक कैद्यांना रंगकामाचे प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणाचा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कैद्यांना उपयोग होणार आहे.

कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून कारागृहात प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. 8 मार्चपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. रंगकामाचे प्रशिक्षण घेणाऱया कैद्यांची ही तिसरी तुकडी आहे. शशिकांत यादगुडे यांच्या देखरेखीखाली कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

बेंगळूर येथील एका पेंट कंपनीच्या सहकार्याने श्रीशैल हुद्दार, महेश तळवार व मुत्तूराज तळवार हे रंगकामाचे धडे देत आहेत. कारागृहातील एका हॉलमध्ये सुरुवातीला कॅनव्हासवर रंगकाम कसे करावे, या कामातील बारकाव्यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देण्यात येत आहे.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी वेगवेगळय़ा संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापूर्वी सेंद्रिय शेती, मोटार वायडिंग, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती आदींविषयी कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, हा यामागचा हेतू आहे.

प्रशिक्षण पूर्ण करणाऱया कैद्यांना ओळखपत्र-प्रमाणपत्र

यापूर्वी प्रशिक्षणावर भर दिला जात नव्हता. शिक्षा पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर तो माणूस जगणार कसा? या विचारातून त्यांना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. हे सर्व उपक्रम शशिकांत यादगुडे यांच्या देखरेखीखाली चालतात. प्रशिक्षण पूर्ण करणाऱया कैद्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रही दिले जाते.

स्वबळावर जगण्यासाठी…

यासंबंधी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणाले, कैद्यांकडे पाहण्याचा समाजाच्या दृष्टीकोनात बदल व्हावा, अशी अपेक्षा आहे. शिक्षा पूर्ण करून किवा जामिनावर कैदी बाहेर पडल्यानंतर त्याला स्वबळावर जगता यावे, याचा विचार करून वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कैद्यांना सक्षम बनविण्यात येत आहे.

Related Stories

श्रावणाचे आगमन : शहरात उत्साह

Omkar B

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

सदाशिवनगर येथे आढळलेल्या अनोळखीचा मृत्यू

Rohan_P

विस्तापितांसाठी होणार रेशनचे वितरण

Patil_p

मेंढपाळाचा मुलगा बनला तहसीलदार

Patil_p

रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mithun mane
error: Content is protected !!