Tarun Bharat

कैलास स्मशानभूमीच्या कर्मचाऱयांची दिवाळी गोड

प्रतिनिधी/ सातारा

सातारची कैलास स्मशानभूमी. या स्मशानभूमीत सेवा देणारे कर्मचारी हे राबत असतात. त्यांना दिवाळीला दरवर्षी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडून बोनस वाटप करण्यात येतो. यावर्षी कोरोनाच्या काळात स्मशानभूमीच्या कर्मचाऱयांनी काम चांगले केले आहे. त्याच कर्मचाऱयांची दिवाळीही बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडून गोड केली गेली आहे. दिवाळीचा बोनस तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या हस्ते कर्मचाऱयांना वितरण करण्यात आले.

कोणत्याही स्मशानभूमीत काम करायचे म्हटले तरी अंगावर काटा उभा राहतो. तेही कोरोनाच्या काळात.मात्र, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कैलास स्मशानभूमीतल्या सर्वच कर्मचाऱयांची काळजी घेते. दरवर्षी तेथील कर्मचाऱयांना दिवाळीचा बोनस देवून त्यांची दिवाळी गोड केली जाते. याही वर्षी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडून कैलास स्मशानभूमीत काम करणाऱया कर्मचाऱयांना सालाबादप्रमाणे दिवाळीचा बोनस ( एक पगार)  तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, जगदीश खंडेलवाल, नितीन माने, जगदिप शिंदे, सचीन भोसले व 7 कर्मचारी उपस्थित होते.यावेळी दीपक प्रभावळकर म्हणाले, की गेली 17 वर्ष हे कर्मचारी स्मशानभूमीत सेवा करीत आहेत. पण विशेष म्हणजे कोरोनाच्या गंभीर संकट काळात सुद्धा अहोरात्र या 7 जणांनी न घाबरता काम केले हे फार अतुलनीय कार्य आहे. या मुळे श्री बालाजी ट्रस्टला सातारकर कधीच विसरू शकत नाहीत. एवढे बोलून सर्व कर्मचाऱयांना दीपावली च्या शुभेच्छा पण दिल्या.

Related Stories

Kolhapur; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

Abhijeet Khandekar

राजेंची कराडच्या रिक्षातून सवारी

Patil_p

सातारा जिल्ह्यात आणखीन ३६ जण पॉझिटिव्ह तर १९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

फलटण विभागामध्ये महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमाला सुरवात

Patil_p

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर

Archana Banage

मविआ सरकार बेवड्यांना समर्पित : मुनगंटीवार

datta jadhav