Tarun Bharat

कैलास स्मशानभूमी सेवकांचा ‘हिरवाई’च्या वतीने सन्मान

वार्ताहर / शाहूपुरी :  

‘हिरवाई’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रा. पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार कैलास स्मशानभूमीत काम करणाऱ्या सेवकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती हिरवाईच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी दिली.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कैलास स्मशानभूमीतील चंद्रकांत लक्ष्मण कुंभार, टेकाराम राजाराम शिर्के, अशोक संपतराव जाधव, सचिन बाबुराव सोनवणे, बाळू ज्ञानदेव गायकवाड, वैशाली नवनाथ वाघ आणि सुनिता बाळकृष्ण माने या सात सेवकांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सदरबझारमधील हिरवाई प्रकल्प येथे गुरुवारी (दि. 12) सकाळी दहा वाजता डॉ. युवराज पवार, डॉ. सोमनाथ साबळे, ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

चौगुले म्हणाल्या, कैलास स्मशानभूमीसाठी निधी उभारणीमध्ये पांडुरंग चौगुले यांचे मोठे योगदान होते. कोरोना काळात त्यांच्या स्मृती पुरस्कार अंत्यविधीच्या निमित्ताने सलग 4 ते 5 वेळा स्मशानभूमीत जाणे झाले आणि त्यावेळी येथील अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवकांचे काम जवळून पाहता आले. त्याचवेळी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण कार्यक्रम करावयाचे ठरवले. या काळात येथील सेवकवर्ग कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या अनंताच्या प्रवासातील शेवटचा सोबती बनून आत्मीयतेने अंत्यसंस्कार करत आहेत, हे अनुभवले. त्यांच्या योगदानाबद्दल कैलास स्मशानभूमी टीमप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, म्हणून त्यांना हा पुरस्कार ज्या डॉक्टरांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन कोरोना रुग्णांची सेवा केली त्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येत आहे.

आईवडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला पाच हजार रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. यापूर्वी तानाजी मस्के, महावीर जोंधळे, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. अनुराधा व डॉ.अच्युत गोडबोले, निर्मला व संजय साळुंखे, विजय निंबाळकर, रघुनाथ ढोले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना प्रदान करण्यात आला आहे.

Related Stories

रिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या

Archana Banage

कोव्हिड हॉस्पिटल्सच्या बेशिस्तीने होतोय घोळ

Patil_p

रोज नवीन नियमामुळे वाहनधारकांची कसरत

Patil_p

कांद्यावरची निर्यात बंदी हटाव:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव

Patil_p

को – 265 जातीच्या ऊसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाही

Archana Banage

‘त्या’ पिढीत कुटुंबाच्या न्यायासाठी वंचितचे आंदोलन

Archana Banage