Tarun Bharat

कॉपी करताना सापडल्यास…; शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सध्या राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे झालं परीक्षा झालेल्या नव्हत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्यांनतर राज्यात दोन वर्षांनंतर ऑफलाइन परीक्षा होत आहेत. कोरोनामुळे शाळा तिथं केंद्र असल्याने अनेक ठिकाणी राज्यात परीक्षा सुरु असताना गैरप्रकार होताना दिसत आहे. शाळा तिथं केंद्र असल्याने कॉपी करण्याचे प्रमाण वाढले आहे. आता याला चाप बसण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्वाची घोषणा केली आहे.

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असून परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असे स्पष्ट निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले. सोबत ज्या केंद्रावर कॉपी केल्याची प्रकरणे आढळल्यास त्यांनतर त्या शाळांना देखील परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली.

दरम्यान, राज्यात अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचं प्रकरण आढळली आहेत. यावर बोलताना या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यंदा शाळा तिथे केंद्र असल्याने दहावीची केंद्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जास्त पोलीस बंदोबस्ताची मागणी आम्ही केली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले

Related Stories

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे कोरोनावर होणार मोफत उपचार

Abhijeet Shinde

पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा: आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

Abhijeet Khandekar

गडहिंग्जल तालुक्यातील 25 गावांची `हद्द’ निश्चित

Abhijeet Shinde

”मोदी सरकारने पेगॅसस विकत घेतलं की नाही ?” राहुल गांधींचा सवाल

Abhijeet Shinde

सत्तांतर प्रक्रियेला ट्रम्प यांची परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!