Tarun Bharat

कॉम्प्युटर बाबाविरोधात कारवाई

Advertisements

मध्यप्रदेशातील आश्रम कारवाईत जमीनदोस्त

वृत्तसंस्था / इंदोर

मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये नामदेव दास त्यागीच्या (कॉम्प्युटर बाबा) विरोधात रविवारी अवैध कब्जाप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कॉम्प्युटर बाबाचा गोम्मटगिरी येथील आश्रम प्रशासनाने जमीनदोस्त केला तसेच ताब्यात घेऊन त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. मध्यप्रदेशात अलिकडेच 28 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान शिवराज सिंग चौहान सरकारच्या विरोधात कॉम्प्युटर बाबांनी लोकशाही बचाओ यात्रा काढली होती.

इंदोरमध्ये विमानतळ मार्गावर हप्सी गावात बाबाचा आश्रम होता. गोशाळेची 46 एकर जमीन हडपून यातील 2 एकर जमिनीवर आश्रम उभारल्याचा आरोप आहे. प्रशासनाने 2 महिन्यांपूर्वी कॉम्प्युटर बाबाला नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. 2 हजार रुपयांचा दंड भरून कब्जा हटविण्यास सांगण्यात आले होते. कॉम्प्युटर बाबांकडून कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत तसेच कब्जाही हटविण्यात आला नव्हता.

कॉम्प्युटर बाबाचा राजकारणाशी संबंध राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग यांना विरोध करत काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या समर्थनार्थ यज्ञ केला होता. तर दिग्विजय सिंगांनी बाबांचा आश्रम जमीनदोस्त करण्याचा प्रकार राजकीय सूड असल्याचा आरोप केला आहे.

Related Stories

हायकमांडच्या भेटीसाठी मुख्यमंत्री लवकरच दिल्लीला

Patil_p

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

मणिपूरमध्ये 5 दिवस इंटरनेट बंद

Patil_p

केरळनंतर तामिळनाडूतही निपाहचा रुग्ण

Patil_p

पोलीस स्थानकात उरकला हळदीचा विधी

Patil_p
error: Content is protected !!