Tarun Bharat

कॉर्नवालचे नाबाद शतक, लकमलचे 5 बळी

Advertisements

वृत्तसंस्था/ ऍटीग्वा

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान विंडीजने पहिल्या डावात 8 बाद 268 धावा जमवित लंकेवर 99 धावांची आघाडी मिळविली. नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेला कॉर्नवॉल 2 षटकार आणि 9 चौकारांसह 60 धावांवर खेळत आहे. लंकेच्या लकमलने 45 धावांत 5 गडी बाद केले.

या कसोटीत पहिल्या दिवशी विंडीजने लंकेचा पहिला डाव 69.4 षटकांत 169 धावांत गुंडाळला होता. माजी कर्णधार होल्डरने 27 धावांत 5 बळी मिळविले होते. त्यानंतर विंडीजने बिनबाद 13 धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला पण लकमलच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. कर्णधार ब्रेथवेट 3 धावांवर बाद झाला. कँपबेल आणि बॉनर यांनी दुसऱया गडय़ासाठी 53 धावांची भागिदारी केली. कँपबेलने 4 चौकारांसह 42 तर बॉनरने 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. मेयर्सने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 45, ब्लॅकवूडने 2, होल्डरने 2 चौकारांसह 19, डिसिल्वाने 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. कॉर्नवॉल आणि डिसिल्वा यांनी आठव्या गडय़ासाठी 90 धावांची भागिदारी केल्याने विंडीजला लंकेवर आघाडी मिळविता आली. कॉर्नवॉलचे कसोटीतील हे पहिले अर्धशतक आहे. विंडीजचा संघ 99 धावांनी आघाडीवर असून त्यांचे दोन गडी खेळावयाचे आहेत. लंकेतर्फे लकमलने 5 तर चमिराने 71 धावांत 2 आणि इंबुलडेनियाने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः लंका प. डाव 69.4 षटकांत सर्वबाद 169, विंडीज प. डाव 101 षटकांत 8 बाद 268 (कॉर्नवॉल खेळत आहे. 60, कँपबेल 42, बॉनर 31, मेयर्स 45, होल्डर 19, डिसिल्वा 46, लकमल 5-45, चमिरा 2-71, इंबुलडेनिया 1-64).

Related Stories

रेल्वेतर्फे ऑलिम्पिकपटूंना मिळणार भरघोस बक्षीस

Amit Kulkarni

रोहन बोपण्णा पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत

Patil_p

ऑस्ट्रीयाच्या थिएमची विविध स्पर्धांतून माघार

Patil_p

हिमा दाससमोर दुखापतीची समस्या

Amit Kulkarni

इलाक्किया दासन, श्रावणी नंदा जलद धावपटू

Amit Kulkarni

युकी भांब्री मेलबर्नमध्ये दाखल

Patil_p
error: Content is protected !!