Tarun Bharat

कोंडगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार


साखरपा परिसरात बिबट्याची दहशत सुरुच

वार्ताहर / ताम्हाने

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याची दहशत सुरुच आहे. नजीकच्या कोंडगाव येथील जोयशी वाडीतील सीताराम धावडे यांच्या घराच्या पडवीला असलेल्या पाडीला रात्री 1 च्या सुमारास बिबट्याने झडप मारून ठार मारल्याची घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

साखरपा परिसरात गेली काही महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु असून त्याचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे. बिबट्या मानवी वस्तीत शिरुन पाळीव पाण्यांना भक्ष्य करत असल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी साखरपा परिसरात एका घराच्या दुसऱया मजल्यावर बिबट्याने पवेश केल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आता बिबट्याने आपला मोर्चा नजीकच्या कोंडगावात वळवला आहे. येथील जोयशी वाडीतील सीताराम धावडे यांच्या घराच्या पडवीला असलेल्या पाडीला बिबट्याने मध्यरात्री 1 च्या सुमारास झडप मारुन ठार मारल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे. गेले काही महिने बिबट्याचा वावर आता मानवी वस्तीत सुरू झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने या घटनांकडे लक्ष घालून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे बिबट्या मानवी वस्तीत शिरत आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

*देवरुख-चाफवली एस.टी.बससमोर डुकरांचा कळप*
देवरुख-चाफवली मार्गावरुन जाणाऱया एस.टी. बससमोर 15-20 डुकरांचा कळप धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा पकार दोन-तीन दिवसापूर्वीचा असून बसमधील एका पवाशाने याचे शुटींग केल्याने हा पकार समोर आला आहे.

Related Stories

चटणीतील बेडकाची दखल, 6 दुकाने बंद करण्याचे आदेश

Patil_p

अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस सज्ज

Patil_p

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर

datta jadhav

नोटबंदी ही ‘देशाची आपत्ती’: प्रियांका गांधी

Abhijeet Khandekar

ओसरगावला पावणेदोन लाखाची दारू जप्त

NIKHIL_N

काँग्रेसच्या प्रयत्नांमुळं चित्ते भारतात; बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत सांगितला घटनाक्रम

Archana Banage
error: Content is protected !!