Tarun Bharat

‘कोकणकन्या’च्या इंजिनमध्ये बिघाड

कोकण रेल्वेमार्गावर विलवडे-निवसरनजीकची घटना

प्रतिनिधी/ खेड

Advertisements

कोकण मार्गावरून धावणाऱया कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये विलवडे-निवसरनजीक रविवारी सकाळी 6.15 च्या सुमारास अचानक बिघाड झाला. सुट्टीच्याच दिवशी झालेल्या इंजिन बिघाडामुळे प्रवाशांना मनस्तापाला समोर जावे लागले. वैभववाडी येथून आलेले इंजिन जोडल्यानंतर 2 तासांनी एक्सप्रेस पुढे मार्गस्थ झाली. या बिघाडाचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावरही झाल्याचे दिसून आले. 

उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह उन्हाळी स्पेशल गाडय़ा हाऊसफुल्ल धावत आहेत. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षाच करावी लागत असल्याने नियमित गाडय़ांतून प्रवाशांना रेटारेटीचा प्रवासही करावा लागत आहे. एकीकडे गर्दीमुळे प्रवाशांना घाम फुटत असतानाच विस्कळीत वेळापत्रकाचाही फटका बसत आहे.

उन्हाळी सुट्टीसह विकेंडमुळे 10111 क्रमांकाच्या मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसला प्रवाशांची गर्दी उसळली होती. ही एक्सप्रेस विलवडे-निवसरनजीक आली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपायलटच्या लक्षात आले. ही बाब वरिष्ठ अधिकाऱयांना कळवल्यानंतर वैभववाडी येथून इंजिन मागवण्यात आले. दोन तासांनी एक्सप्रेस मार्गस्थ होताच रखडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिन बिघाडामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण मार्गावरुन धावणारी तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेससह अन्य रेल्वेगाडय़ा उशिराने धावत होत्या. यामुळे सुट्टीच्याच दिवशी प्रवाशांना यातायातीला समोर जावे लागले.  

पनवेल-करमाळी समर स्पेशल 3 तास उशिराने

उन्हाळी सुट्टीसाठी कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेल्या पनवेल-करमाळी समर स्पेशल गाडीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, सुट्टीच्या दिवशीच 3 तास उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी रात्री 10 वाजता पनवेल येथून सुटणारी ही स्पेशल मध्यरात्री 1 वाजता सुटली. तोपर्यंत प्रवाशांना स्थानकातच तिष्ठत बसावे लागले.

Related Stories

मालवणात पुन्हा ट्रॉलर लुटण्याचा प्रकार

NIKHIL_N

ग्रामस्थांनी गावात न घेतल्याने युवकावर रानात टेम्पो उभा करत राहण्याची वेळ

Abhijeet Shinde

आमदार राणेंकडून डिझेल, वाहन उपलब्ध

NIKHIL_N

रत्नागिरीत आणखी चार कोरोनाचे बळी, २४ तासात ४३ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

रिफायनरी समर्थनाचा राजापूर नगर परिषदेत ठराव

Patil_p

डंपर चालक मालक संघटना दरवाढीसाठी आक्रमक

NIKHIL_N
error: Content is protected !!