Tarun Bharat

कोकणातील दोन युवकांची ‘अंतराळ’ भरारी!

मनोज पवार / दापोली

लॉकडाऊनच्या काळात घरीच असलेल्या खगोलप्रेमींसाठी नासाने दिलेला ‘टास्क’ पूर्ण करून कोकणातील दोन युवकांनी चार नवीन लघुग्रह शोधून काढले आहेत. दापोलीतील शिवाजीनगर आजोळ असणाऱया अक्षत मोहिते व पेण हे मुळगाव असणाऱया प्रज्ञेश म्हात्रे यांनी ही किमया केली. लॉकडाऊनच्या कालावधीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी कोकणचे नाव जगाच्या पटलावर नेऊन ठेवले आहे.

   अक्षय मोहिते सध्या नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करतो. तो केवळ 19 वर्षांचा आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अक्षत त्याच्या ठाणे येथील घरी अडकला आहे. या लॉकडाऊनच्या काळात नासाने जगभरातील अंतराळप्रेमी व खगोल अभ्यासकांकरिता एक योजना राबवली होती. या योजनेला नासाने इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन असे नावदेखील दिले होते. भारतातून या शोध मोहिमेचे प्रतिनिधित्व टीम ऑलॉम्पस यांनी केले. या टीममध्ये अक्षत मोहिते व त्याचा मित्र प्रज्ञेश म्हात्रे हे होते. त्यांना नासाकडून अंतराळाचा सॅटेलाईट व टेलिस्कोपच्या माध्यमातून घेतलेला रेडिओ इमेज डेटा पुरवण्यात आला होता. या डेटामध्ये अंतराळातील तब्बल 150 फोटो या दोघांनी अभ्यासले. हे फोटो काळे-पांढरे व ठिपके या प्रकारात होते. उपग्रह देत असणाऱया फोटोंच्या सहाय्याने त्यांना अंतराळातील नवीन उपग्रह शोधून काढायचे होते. हे काम इतके किचकट, वेळकाढू व डोळे फोडणारे असते की एखाद्या फोटोवर क्लिक केल्यानंतर उपग्रहाने जागा थोडी जरी बदलली तरी फोटो पुढे सरकतो. यातून अ, ब पोझिशन तयार होते. यामुळे पुन्हा त्या फोटोवर क्लिक करुन पुन्हा झुम करुन उपग्रहाने जागा बदलण्याआधी पुन्हा त्यावर अभ्यास करावा लागतो. अशापद्धतीने त्यांनी 14 एप्रिल ते 12 मे या कालावधीत पीआरए-001, पीआरए-002, पीआरए-003, पीआरए-004 असे चार नवीन उपग्रह शोधून काढले.

   या लघुग्रहांना नासाने मान्यतादेखील दिली असून त्यांचे कौतुक केले आहे. तसे प्रमाणपत्रेदेखील अक्षत व प्रज्ञेश यांना मेल केली आहेत. शिवाय या नव्याने शोधून काढलेल्या लघुग्रहांची माहिती नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर लोड केली आहे. याबाबत बोलताना अक्षत याने आपण भारतीय असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली.

   अवकाशामध्ये शेकडो लघुग्रह असतात. अवकाशात ताऱयांची टक्कर झाल्यानंतर लघुग्रहांची निर्मिती होते. पृथ्वीची निर्मितीदेखील सूर्याला टक्कर देऊन गेलेल्या दुस्रया ताऱयापासून झालेली आहे. असे शेकडो लघुग्रह सध्या अंतराळात फिरत आहेत. भारताच्या जवळून या एप्रिल महिन्यामध्ये 4 किलोमीटर लांबीचा एक लघुग्रह येऊन गेला होता. हा लघुग्रह चंद्र व पृथ्वी यांच्यामधून पृथ्वीपासून सुमारे 500 कि. मी. अंतरावरून अत्यंत वेगाने पुढे निघून गेला. ही घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवलेली आहे. या लघुग्रहांमध्ये मोठय़ाप्रमाणात मिनरल व धातू सापडतात. यामध्ये सोने, चांदी, कॉपर आदींचा समावेश असतो. यामुळे या मोहिमा महत्वाच्या असतात. जेव्हा मिशन आर्टमेन पूर्ण होईल व 2024 साली नासा चंद्रावर माणूस पाठवेल त्यावेळी या लघुग्रहांना शास्त्राrय पद्धतीने कॅच करून यावर उत्खनन करण्यात येणार आहे. तेथे कितीप्रमाणात सोने, चांदी, कॉपर सापडतं याचादेखील अभ्यास करण्यात येणार आहे. भारतदेखील गगनयान मिशन राबवत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते थोडे पुढे गेलेले आहे. हे संकट जगावर आले नसते तर गगनयान मिशनचे ट्रेनिंग डिसेंबर महिन्यात सुरू होणार होते. 

Related Stories

माजगावात महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

खरीप हंगाम विमाधारकांना 23 लाख 62 हजारांची भरपाई

NIKHIL_N

चंद्रकांत राणे यांचे निधन

NIKHIL_N

जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार!

Anuja Kudatarkar

जागतिक योगदिनी ‘योगी पपेटबाबा’ची एन्ट्री

NIKHIL_N

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!