Tarun Bharat

कोकणी भाषा मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर

हरिश्चंद्र नागवेकर यांना सेवा, डॉ. प्रकाश वजरीकर यांना शिक्षक, तर स्व. नित्यानंद नाईक यांना कार्यकर्ता पुरस्कार घोषित

प्रतिनिधी/ फातोर्डा

कोकणी भाषा मंडळ आपला 58 वा वर्धापनदिन 30 रोजी ऑनलाईन पद्धतीने साजरा करणार आहे. यावेळी ज्ये÷ साहित्यिक व लोकवेद संशोधिका जयंती नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रम संध्याकाळी 5 वा. ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. दरम्यान, कोकणी भाषा मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

वर्धापनदिन कार्यक्रमात कोकणी भाषा मंडळाचे वार्षिक साहित्य, सेवा, शैक्षणिक, पत्रकारिता, स्तंभलेखन, बालसाहित्य आदी पुरस्कारांचे मानकरी आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांच्या प्रतिक्रिया सर्वांना ऐकायला मिळतील. या कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून कोकणी गायन व नृत्य सादरीकरण होणार आहे. सदर कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. कोरोना-19 विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मंडळाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. याची सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी नोंद घ्यावी. तसेच कोकणी भाषा मंडळाचे हितचिंतक व साहित्य रसिकांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यांनी केले आहे.

दरम्यान, कोकणी भाषा मंडळाने 2020 वर्षांचे पुरस्कार पुढीलप्रमाणे जाहीर केलेले आहेत-मंडळाचा सेवा पुरस्कार : हरिश्चंद्र नागवेकर, सेराफीन कॉता यांच्यातर्फे फेलिस्यू कार्दोज यांच्या स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार : डॉ. प्रकाश वजरीकर, जुझे पिएदाद क्वाद्रुस यांच्या स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार : स्व. नित्यानंद नाईक, लिगोरियो फुर्ताद ट्रस्ट  पत्रकारिता पुरस्कार : जुझे साल्वादोर फर्नांडिस, दिनेश मणेरकर यांच्यातर्फे चंद्रकांत केणी यांच्या स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार : उल्हास नायक, दिनेश मणेरकर यांच्यातर्फे रामनाथ मणेरकर यांच्या स्मरणार्थ अनुवाद पुरस्कार : माणिकराव नायक गावणेकर  (पुस्तक-श्री रामकृष्ण अमृतवाणी).

स्व. नरसिंह दामोदर नायक यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार : अँथनी बारकूर (पुस्तक-मांसां, कथासंग्रह), स्व. रॉक बार्रेटो यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार : शैलेंद्र मेहता (पुस्तक-सिसिफस तेंगशेर, कवितासंग्रह), कोकणी भाषा मंडळ साहित्य पुरस्कार : मारिओ मिनेझिस (शिरलो, तियात्र), मनोहरराय सरदेसाई यांच्या स्मरणार्थ बालसाहित्य पुरस्कार : नयना आडारकर (पुस्तक-बेलाबांयचो शंकर आनी हेर काणयो).

Related Stories

फातोडर्य़ात ‘सेवा और समर्पण अभियान’

Amit Kulkarni

कोरखण चणई ते पालये पठार येथील काजू बागायतीला आग

Amit Kulkarni

आरजी भाजपकडून निधी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजतात

Amit Kulkarni

केळशी पंचायत थेट शिपाई भरतीला न्यायालयाची स्थगिती

Amit Kulkarni

आरजी हॉस्पिटलतर्फे रन फॉर हेल्थ मेरेथॉन

Amit Kulkarni

गणेश जयंतीनिमित्त राज्यात आजपासून भरगच्च कार्यक्रम

Amit Kulkarni