Tarun Bharat

कोकण मार्गावर आजपासून मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल

Advertisements

प्रतिनिधी/ खेड

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल कोकण मार्गावर धावू लागल्या असतानाच 24 ऑक्टोबरपासून मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशलची त्यात भर पडणार आहे. दसऱयाच्या पार्श्वभूमीवर धावणाऱया या गाडीमुळे कोकणवासियांची चांगली सोय होणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर 22 मार्चपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया गाडय़ांना सलग 5 महिने बेक लागला होता. गणेशोत्सव कालावधीतील गणपती स्पेशल वगळता अन्य रेल्वेगाडय़ा यार्डातच होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाने फेस्टिवल स्पेशल चालवण्यास सुरूवात केली आहे. या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

दसऱयाच्या पार्श्वभूमीवर मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल गाडीच्या कोकण मार्गावर 16 फेऱया धावणार आहेत. ही गाडी मडगाव येथून दररोज सायंकाळी 4.45 वा. सुटून पहाटे 5.50 वा. मुंबईला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई येथून रात्री 11.05 वा. सुटून सकाळी 12.10 वा. मडगावला पोहोचेल. या गाडीला करमाळी, थिविम, पेडणे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, दादर आदी थांबे देण्यात आले आहेत.

Related Stories

गुहागर चौपाटीवरील अनधिकृत दुकानांंवर कारवाई

Archana Banage

मालगुंड येथे 16 वर्षीय युवतीची गळफासाने आत्महत्या

Patil_p

व्यापाऱ्याकडील वितळवलेले सोने-चांदी पोलिसांनी केले जप्त

Abhijeet Khandekar

जिल्हा मंडप, लाईट, केटरर्स असोसिएशनने केला सरकारचा निषेध

Patil_p

आयलॉग प्रकल्पाला स्थगिती

Patil_p

आणखी दोघांचा मृत्यू , 138 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!