Tarun Bharat

कोकण मार्गावर आणखी एक फेस्टिवल स्पेशल धावणार

प्रतिनिधी/ खेड

दीपावली सुट्टीच्या हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाया रेल्वे गाडय़ांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी 22 डब्यांची मडगाव-पनवेल फेस्टिवल स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही स्पेशल मडगाव येथून 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सुटेल. दुस्रया दिवशी मध्यरात्री 3 वाजून 15 मिनिटांनी पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पनवेल येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मडगावला पोहचेल. या स्पेशल गाडीला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आदी  स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. दीपावली निमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवी स्पेशल व पनवेल-थिवी स्पेशल 3 व 4 नोव्हेंबर ला धावणार आहेत. या पाठोपाठच परतीच्या प्रवासासाठी आणखी एक फेस्टिवल स्पेशल चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांना विशेषतः दिलासा मिळाला आहे.

Related Stories

हेल्मेट सक्तीआधी जागरुकता निर्माण करा

Patil_p

सिंधुदुर्गला गोव्यातून ऑक्सिजन मिळणार

NIKHIL_N

एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पद रिक्त

NIKHIL_N

रत्नागिरी : ‘रोटरी’चे ५ जण आयआयटी, एनआयटी, एचपीएच्या प्रवेशास पात्र

Archana Banage

कोकणात होणार काथ्या उद्योगावर आधारित ‘कॉयर क्लस्टर’

Patil_p

कोल्हापूरच्या ‘क्वारंटाईन’ युवकाची गळफासाने आत्महत्या

NIKHIL_N