Tarun Bharat

कोकण मार्गावर ६ जानेवारीपासून ‘वास्को-पाटणा’ पुन्हा धावणार

प्रतिनिधी / खेड

कोकण मार्गावर २ ते ३० डिसेंबर याकालावधीत दर बुधवारी चालवण्यात आलेल्या ‘वास्को द गामा-पाटणा’ सुपरफास्ट साप्ताहिक गाडीला प्रवाशांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ६ जानेवारीपासून ही गाडी पुन्हा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने चालवण्यात येणारी २१ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून ३० जानेवारीपर्यंत धावणार आहे. ही गाडी वास्को येथून दर बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १२.१० वाजता पाटणा येथे पोहचेल . परतीच्या प्रवासात पाटणा येथून दर शनिवारी दुपारी २ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ८.५५ वाजता ‘वास्को-द-गामा’ येथे पोहचेल. कोकण मार्गावर पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

Related Stories

हुमरमळा-वालावल गाव विकासाचे मॉडेल!

NIKHIL_N

मनोरूग्णालय कर्मचाऱयाची आत्महत्या

Patil_p

जिह्यातील पहिली हापूस पेटी दापोलीतून रवाना

Patil_p

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

NIKHIL_N

गोवेरीत आढळला चक्क ‘ब्लॅक पँथर’

NIKHIL_N

Ratnagiri : मंडणगडात कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू!

Abhijeet Khandekar