Tarun Bharat

कोकण मार्गावर विलंबाने धावणार १६ रेल्वेगाड्या

Advertisements

प्रतिनिधी / खेड

कोकण मार्गावरील रोहा-वीर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून ट्रक दुहेरीकरणाच्या पायाभूत सुविधा सुधारणांचे काम हाती घेण्यात आले आहे. 22, 25, 27, 28, 29 व 30 ऑगस्टदरम्यान हे काम हेणार आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांसह अन्य रेल्वेगाड्याही विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

रोहा ते वीर या 46 किलोमीटर मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे. सध्या 95 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या एक-दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या मार्गावर दुपरीकरण कामातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कामाला शुक्रवारी प्रारंभ झाला. शनिवारी तिरुअनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल रत्नागिरी, चिपळूण, खेडदरम्यान अडीच तासांसाठी तर जामनगर-तिरूनेलवेली स्पेशललाही कोलाड-माणगाव दरम्यान दोन तास 20 मिनिटे थांबा दिला आहे.

22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूअनंतपुरम स्पेशलला कोलाड येथे एक तास थांबा देण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासात वीर येथे 20 मिनिटांसाठी ही गाडी थांबवण्यात येईल. 25 रोजी हापा-मडगाव एक तास 10 मिनिटे विलंबाने धावेल. तिरूअनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक स्पेशल रत्नागिरी व चिपळूण दरम्यान एक  तास थांबेल. तिरूनेलवेली-दादर वीर येथे 20 मिनिटे थांबणार आहे. 27 रोजी जामनगर-तिरूनेलवेली दोन तास 40 मिनिटे उशिराने धावेल.

28 रोजी लोकमान्य टिळक-तिरूअनंतपुरम दीड तास विलंबाने धावणार आहे. जामनगर-तिरूनेलवेली दोन तास 40 मिनिटे थांबेल. तिरूअनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक रत्नागिरी, चिपळूण, खेडदरम्यान तीन तास थांबणार आहे. 29 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरूअनंतपुरम दीड तास तर एर्नाकुलम-अजमेर करंजाडी येथे 30 मिनिटांसाठी थांबेल. याचदिवशी एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनसला 20 मिनिटांसाठी वीर येथे थांबा देण्यात येणार आहे. 30 रोजी मडगाव-निजामुद्दीन स्पेशल रत्नागिरी, चिपळूण, वीर स्थानकांदरम्यान एक तास 10 मिनिटे थांबेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर एक तासासाठी रोहा येथे थांबेल. मडगाव-सीएसएमटी मुंबई 50 मिनिटांसाठी चिपळूण व खेडदरम्यान थांबणार आहे.

Related Stories

दक्षिण रत्नागिरीत मुसळधार

Patil_p

तनया आरोलकर हिचा लोकमान्यतर्फे सत्कार

Rohan_P

250 कोटी ही कोकणच्या जनतेची थट्टा!

NIKHIL_N

कोरोनाग्रस्ताच्या बहिणीसह 28जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

Patil_p

जनतेने अवैध धंद्यांची माहिती द्यावी!

NIKHIL_N

रत्नागिरी : वाळूमाफियांमुळे संगमेश्वर खाडीभागातील सुरक्षा धोक्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!