Tarun Bharat

कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्यांना वाहिली आदरांजली

रत्नागिरी रेल्वेस्थानक येथील श्रमशक्ती स्मारका ठिकाणी पार पडला 23 वा स्मृतीदिन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वे उभारणीच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.  या उभारणीसाठी  प्राण गमावलेल्या कामगार-अभियंत्यांना श्रमशक्ती स्मारकावर 23 व्या स्मरण दिनाच्या निमित्ताने  आदरांजली वाहिण्यात आली.

 कोकणच्या दर्याखोयातून बोगदे पूल उभारत  रेल्वे  मार्गाची उभारणी हे एक मोठे आव्हान होते. अनेक अडचणीला सामोरे जात कोकण रेल्वेच्या कामगार-अभियंते-अधिकाऱयांनी कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती केली. या उभारणीच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या रेल्वे मार्गाच्या उभारणी मध्ये बलिदान देणाऱया मंडळींच्या आठवणी मध्ये 23 वर्षांपूर्वी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकांच्या परिसरात श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आले.

   श्रमशक्ती स्मारकवर गुरूवार 15 ऑक्टोबर रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंडये यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हि उपस्थित होते. यावर्षी कोव्हिड च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून विशेष खबरदारी घेत गर्दी टाळत हा कार्यक्रम करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांनी हि सामाजिक अंतर राखत, एकावेळी पाच जणच  श्रमशक्ती स्मारक परिसरात उपस्थित राहून  आदरांजली वाहिली. आजच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने स्मारकाचा परिसर आकर्षकरित्या सजवण्यात आला होता.

Related Stories

जिल्हास्तरीय शालेय जूडो स्पर्धेत समृद्धी मानेचे घवघवीत यश

Anuja Kudatarkar

रत्नागिरीतील घडामोडींचे सिंधुदुर्गात पडसाद

NIKHIL_N

चिपळुणात तापाच्या साथीने रूग्णालये हाऊसफुल्ल

Patil_p

हर्णे बंदरात दुकान भस्मसात

Patil_p

भात खरेदी प्रक्रियेबाबत लक्ष घालावे!

NIKHIL_N

खेडमध्ये कर्जाच्या बहाण्याने 73 हजाराची फसवणूक

Patil_p
error: Content is protected !!