Tarun Bharat

कोकण रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण

मडगाव, थिवीत बसस्थानक, पार्किंग : करमळीत पक्षी निरीक्षण व्यवस्था,एकूण 13 कोटी रूपयांचा खर्च

प्रतिनिधी /मडगाव

सुमारे 13 कोटी रूपये खर्च करून मडगाव कोकण रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. रेल्वे स्थानकावर आता बसस्थानक तसेच वेगळी पार्किग व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना घेऊन येणाऱया टॅक्सी रेल्वे स्थानकाच्या आत न येताच जिथे पार्किग व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथेपर्यंत प्रवाशांना घेऊन येतील व परस्पर पुन्हा बाहेर पडतील. दाभोळी विमानतळावर जशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने मडगाव रेल्वे स्थानकावर व्यवस्था केली जात आहे.

टॅक्सी घेऊन येणारे प्रवासी आता थेट आतमध्ये येतात. पण, जेव्हा पार्किग व्यवस्थेचे संपूर्ण काम पूर्ण झाले की, त्यांना आतमध्ये येण्याची जरूरी भासणार नाही. ‘कोकण कन्या’ रेलगाडी यायची झाली की, अनेक वाहने रेल्वे स्थानकावर येत असतात. त्यामुळे स्थानकावर गर्दी होत असते, ही गर्दी देखील टळली जाणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर मल्टिलेव्हल पार्किग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

करमळीत पक्षी निरीक्षण सुविधा

मडगाव प्रमाणेच करमळी रेल्वे स्थानकावर पक्षी निरीक्षणासाठी खास सुविधा उलपब्ध केली जात आहे. करमळी स्थानकाजवळ करमळीचे प्रसिद्ध तळे असून या तळय़ात असंख्य पक्षी येत असतात. या पक्षांचे निरीक्षण करण्याबरोबर ज्यांना फोटोग्राफीचा छंद आहे ते आपला छंद या ठिकाणी पूर्ण करू शकतील. पक्षी निरीक्षण करण्यासाठी विदेशी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलीय.

थिवीतही बसस्थानक, पार्किग सुविधा

कोकण रेल्वे मार्गावरील थिवी हे सुद्धा एक महत्वाचे स्टेशन. या स्टेशनवरसुद्धा बसस्थानक तसेच पार्किग सुविधा उलपब्ध केल्या जात आहे. मडगाव, करमळी व थिवी स्थानकावर चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी कोकण रेल्वेने सातत्याने प्रयत्न केला आहे. आत्ता बस स्थानक, पार्किग सुविधा तसेच पक्षी निरीक्षणासाठी खास प्लॅटफॉर्म उभारला जात असून त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने उलपब्ध करून दिला आहे.

कोरोनामुळे 360 कोटींचा फटका

कोविड-19 महामारीमुळे कोकण रेल्वेला गेल्या आर्थिक वर्षात 360 कोटी रूपयांचा आर्थिक फटका बसलेला. कोकण रेल्वेने आपल्या असंख्य रेलगाडय़ा बंद केल्या. मात्र, आत्ता हळू हळू स्थितीत सुधारणा होत असून बंद करण्यात आलेल्या रेलगाडय़ा सुरू होत आहे. मात्र, या रेलगाडय़ा विशेष गाडय़ा म्हणून धावत आहे. यंदा गणेश चतुर्थीला प्रवाशांची संख्या समाधानकारक होती. आत्ता दिवाळी व नंतर नाताळ सणाला पुन्हा प्रवाशी रेल्वेतून ये-जा करतील अशी अपेक्षा कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी बाळगली आहे. रेल्वे स्थानकावर स्टॉल्स घालून व्यवसाय करणाऱयांना देखील कोकण रेल्वेला सूट द्यावी लागली. त्याचा परिणाम देखील कोकण रेल्वेच्या महसूलावर झालेला आहे.

Related Stories

सम्राट कपिलेश्वरीचा 27 रोजी अधिकारग्रहण सोहळा

Omkar B

कुठ्ठाळीत ट्रॉलरला आग, 15 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni

भाऊसाहेबांचे सूड, स्वार्थाचे नव्हे, परोपकाराचे राजकारण!

Amit Kulkarni

सत्तरी तालुका शेतकरी, गवाणे सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक गणेश चतुर्थी नतर शक्य.

Amit Kulkarni

रत्नागिरी : कोकण मार्गावर २ डिसेंबरपासून ‘वास्को-पाटणा’ पुन्हा धावणार

Archana Banage

गांवडोंगरीचे माजी सरपंच अशोक वेळीप ’टीएमसी’त

Patil_p