Tarun Bharat

कोगनोळी महामार्गावर टेम्पो पलटी

कोगनोळी : निपाणीहून कोल्हापूरकडे दूध वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. हा अपघात बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्गावरील दूधगंगा पुलाजवळ घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणीहून कोल्हापूरकडे गोकुळ दूध संघाचा टेम्पो क्रमांक एम. एच. 09 सी. ए. 7583 हा दुधाचे कॅन घेऊन जात होता. कोगनोळीजवळील दूधगंगा पुलाजवळ आला असता गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून टेम्पो दुभाजकावर पलटी झाला. त्यामुळे कॅनमधील सर्व दूध रस्त्यावर सांडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाहनाचे मात्र किरकोळ प्रमाणात नुकसान झाले आहे.

जयहिंद डेव्हलपर्सचे निरीक्षक नेताजी यादव व सहकाऱयांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला घेत अन्य वाहनांना रस्ता खुला करून दिला.

Related Stories

राज्योत्सवानिमित्त विविध ठिकाणी कमानी उभारण्यास सुरुवात

Amit Kulkarni

उचगाव परिसरात कडकडीत हरताळ

Amit Kulkarni

केंद्राकडून राज्याला एकही पैसा मिळाला नसल्याचा आरोप

Amit Kulkarni

कमकारट्टी येथे 11 जुगाऱयांना अटक

Patil_p

चैतन्यमय वातावरणात बाप्पांचे आगमन

Amit Kulkarni

केंद्र सरकारने सीमावासियांना न्याय द्यावा

Amit Kulkarni