Tarun Bharat

कोगेतील धोकादायक वळणामुळे अपघात, जीवित हानी टळली

Advertisements

कसबा बीड / प्रतिनिधी

कोगे तालुका करवीर येथे कोगे – कोल्हापूर या नवीन केलेल्या रोडवर वक्री वळणामुळे, ड्रायव्हर चक्री होऊन गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघात ठिकाणावरून  मिळालेल्या माहितीप्रमाणे या अपघातात शेवरेलो कंपनीची बीट या मॉडेलची गाडी ही कोगे गावाकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. रात्रीचा प्रवास असल्याने ड्रायव्हर व्यक्तीस वक्री वळण लक्षात न आल्याने गाडी थेट भुईमूग शेतात गेल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात मध्यरात्री किंवा  पहाटेच्या वेळेस झाला असल्याची कुजबुज होती. या गाडीवरती  नंबर प्लेट काढल्यामुळे  ही गाडी नेमकी कोणाची  त्याची  सद्यस्थिती वरून  कोणाकडून  ठोस माहिती मिळाली नाही. 

पण हे वळण जवळपास 85 ते 90 अंशांच्या कोनामध्ये असल्याने ड्रायव्हर लक्षात न आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी शेतात गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आज पर्यंत जवळपास पाच ते सहा फोर व्हीलर व दहा-बारा मोटर सायकल या वळणावरती चालकाचे नियंत्रण सुटल्याने व हे वक्री वळण लक्षात न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये बऱ्याच टु-व्हीलर चालकांना फॅक्चर स्वरूपात दुखापत झालेल्या आहेत.
 
या ठिकाणावरून असे बरेच अपघात झाल्यामुळे सदर ठिकाणी पंचायत समिती करवीर माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यानी तात्काळ भेट देऊन या वळणाच्या ठिकाणी स्पीड बेकरची आवश्यकता आहे. तसेच या रोडवर कोठेही दिशादर्शक बोर्ड नसल्याने असे अपघात घडत आहेत. असे मोबाइल फोनद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून यावरती ठोस निर्णय घ्यावा असे सांगितले.
त्यामुळे वळणाच्या शेजारील शेतातील शेतकरी शेतात काम करताना त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या सर्व गोष्टीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली पाहिजे, अन्यथा आजपर्यंत झालेले अपघात यामध्ये जीवित हानी झाली नाही. पण भविष्यात होणार नाही याची खात्री कोण देणार ? भविष्यात मोठा अपघात झाल्यानंतर व जीवित हानी झाल्यानंतरच प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न शेजारील सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

Related Stories

दिलबहार तालीम मंडळाने पटकावला महापौर चषक

Sumit Tambekar

कोल्हापूर : शिये येथे तृतीयपंथीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

Abhijeet Shinde

बागेच्या जागेवरील तीस वर्षांच्या अतिक्रमणावर हातोडा !

Abhijeet Shinde

सिध्दार्थ शिंदे यांच्या मुद्द्य़ांची बजेटमध्ये दखल

Abhijeet Shinde

पहिल्या कोरोना बळीमुळे ‘कोल्हापूर’ रेड झोनमध्ये

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सार्वजनिक ग्रंथालयांना लवकरात लवकर अनुदान द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!