Tarun Bharat

कोचरीत 6 दिवसांनंतर मगरीला पकडण्यात यश

Advertisements

विहिरीत आढळली 250 किलो अजस्त्र मगर

वार्ताहर / यमकनमर्डी

मागील गुरुवारी कोचरीच्या हिरण्यकेशी नदीकाठाजवळ असणाऱया रावसाहेब मगदूम यांच्या विहिरीत अजस्त्र मगर आढळली होती. त्यामुळे शेतकऱयांत भीतीचे वातावरण पसरले होते. लवकरात लवकर मगरीला पकडण्याची मागणी शेतकऱयांसह नागरिकांतून होत होती. दरम्यान, तब्बल 138 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात वन खात्याला यश आले. सदर मगरीचे वजन 250 ते 300 किलोपर्यंत असल्याचे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.

सहा दिवसांपूर्वी विहिरीत दिसलेल्या मगरीला बाहेर काढण्यासाठी शुक्रवार दि. 12 रोजी विहिरीतील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यात आले होते. मात्र, मगरीचे वजन खूप असल्याने तिला वर काढताना अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, पुन्हा विहिरीत पाणी भरून तिला भूक लागल्यावर तरी ती बाहेर येईल, असा अंदाज बांधून विहिरीच्या शेजारी जाळे टाकण्यात आले. मात्र, तोही प्रयत्न अयशस्वी झाला.

परिसरातील शेतकरी सदर मगर पाहिल्यापासून शेताकडे जाण्यास घाबरत होते. त्यामुळे सदर मगर कशी पकडायची या चिंतेत वन विभागाचे कर्मचारी होते.

Related Stories

अहंकार बाजूला सारून प्रेमाने जगा

Amit Kulkarni

ओलमणीजवळ कॅन्टर पलटी होऊन क्लिनर जागीच ठार

Patil_p

मृत्युंजयनगर, अनगोळ येथील ‘त्या’ चेंबरची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

झुंजवाड येथे ट्रक्टरखाली सापडून शेतकऱयाचा मृत्यू

Amit Kulkarni

अधिकाऱयांच्या बचावासाठी नर्सेसवर गंडांतर

Omkar B

डी.के.शिवकुमार यांनी स्वीकारला केपीसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!