Tarun Bharat

कोजिमाशि पतपेढी चेअरमन निवड बिनविरोध

Advertisements

प्रतिनिधी / सांगरूळ


कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढी च्या चेअरमन पदी किरण पुंडलिक पास्ते डी एम हायस्कूल सांगाव यांची बिनविरोध निवड झाली . संचालक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी एन एम माने होते. मावळते चेअरमन एल डी पाटील यांनी आपल्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता यामुळे हे पद रिक्त होते.

चेअरमन निवडी पूर्वी सुकाणू कमिटी सदस्य प्रा. जयंत आसगावकर, वसंतराव देशमुख, बापूसाहेब शिंदे, के के पाटील, व्ही जी पोवार, उदय पाटील, नाना गोखले, आर एस मर्दाने यांची बैठक होऊन यामध्ये चेअरमन पदासाठी किरण पास्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांचे नावाचा बंद लिफाफा संचालक मंडळाच्या बैठकीत दिला होता.

चेअरमन पदासाठी किरण पास्ते यांचे नावाला सूचक म्हणून संचालक तानाजी पाटील यांची तर अनुमोदक म्हणून संचालीका सुनिता पाटील यांनी सही केली. यावेळी उपाध्यक्ष सुप्रिया शिंदे ,संचालक तानाजी पाटील ,लक्ष्मण पाटील, प्रकाश वरेकर ,एम पी चौगले, एस बी पाटील, आर एस पाटील, आर बी पाटील, मनोहर पाटील,सदाशिव चौगुले, मनीषा खोत, सुनिता पाटील, अरुण कांबळे, शिवाजी लोंढे, व्ही के शिंदे, विद्यासागर चौगुले, सुरेश देसाई, उपस्थित होते . बिनविरोध निवडीबाबत अध्यक्ष किरण पास्ते यांनी सर्वांचे आभार मानून सुकाणू कमिटी व संचालक मंडळाने ज्या विश्वासाने चेअरमन पदावर निवड केली त्या विश्वासास पात्र रहात पतपेढीच्या व सभासद हिताच्या कारभार करू अशी ग्वाही दिली.

Related Stories

कबनूर ओढ्यातील मासे मृतावस्थेत; शाश्वत उपायांची आवश्यकता

Archana Banage

पालकांना दिलासा! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

Tousif Mujawar

सातारा तालुक्यात गावागावात शिवसेनेची विचारधारा रुजवणार

Patil_p

कोल्हापूर : ट्रॅक्टरच्या धडकेत बोरवडेचा मोटरसायकलस्वार ठार

Archana Banage

राज्यसभेवरून बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले शेवटच्या ५ मिनिटांत…..

Rahul Gadkar

वाकेश्वर- भुरकवडीत हवाई सर्वेक्षण : ड्रोनच्या सहाय्याने पथदर्शी प्रयोग

Archana Banage
error: Content is protected !!