ऑनलाईन टीम / कोटा :
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना परिस्थिती अनियंत्रित आहे. राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असून, मंगळवारी मध्यरात्री कोटा येथील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोन कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेज कोविड रुग्णालयात 19 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्यात आला होता. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची प्रकृती खालावली. आणि दोन रुग्णांना आपला जीव गमवावा, असा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर केला आहे.
तर रुग्णालयाचे अधीक्षक निलेश जैन यांनी म्हटले आहे की, एका महिलेचा 2 ते 5 मिनिटांच्या गोंधळात ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाला.