Tarun Bharat

कोटींच्या चीपची अफवा; चौघांना जेलची हवा

Advertisements

कराड ग्रामिण पोलिसांची दोन गावात कारवाई

प्रतिनिधी/ कराड

जुन्या काळातील टि. व्ही. मध्ये एक चीप असून ती कोटी रूपयांना विकत घेतली जात असल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरली आहे. कराड तालुक्यातील तांबवे परिसरातील दोन गावात अशी अफवा पसरवणाऱया चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई केली. 

दरम्यान, जुन्या टि. व्ही. मधील चीप, लाल पारा अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर जुन्या टि. व्ही. तील चीपची अफवा पसरली आहे. या चीपची मागणी वाढली असून ती चीप कुठेही मिळत नाही. ज्यांच्या घरातील टि. व्ही.मध्ये चीप आहे, त्यांना कोटी रूपये चिपच्या बदल्यात मिळतील अशी अफवा आहे. या अफवेचा फायदा घेऊन तांबवे परिसरातील चार युवक ग्रामीण भागातील लोकांची दिशाभूल करत होते. याची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक उदय दळवी, हवालदार अमित पवार, सज्जन जगताप, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांनी या युवकांना पकडले. त्यांच्याकडे पोलीस निरिक्षक धुमाळ यांनी दुपारी चौकशी केली. या युवकांच्या मोबाईलमधील माहिती तपासले जात होते. या युवकांनी कोणाची फसवणूक केली आहे का? याचाही तपास सुरू होता. दरम्यान टि. व्ही. तील चीप, लाल पारा या अनुषंगाने अफवा पसरवल्या जात असून अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

सरपंच आरक्षण सोडतीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Abhijeet Shinde

सातारा : मार्चअखेर पालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील

datta jadhav

सातारा : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

datta jadhav

विकेल ते पिकेल योजना शेतकऱ्यांना फायदेशीर : माजी आमदार प्रभाकर घार्गे

Abhijeet Shinde

सातारा : फेक अकाऊंटवरुन लग्नासाठी धमकी

datta jadhav

वीज पडून दोघांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!