Tarun Bharat

कोट्यवधींची संपत्ती असणारे दरेकर मजूर कसे?

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मजूर संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. त्यावर सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवत याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागाने दरेकर यांना नोटीस पाठवून तुम्ही कोणत्या प्रकारच्या मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा त्यांना केली आहे.

अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारी व्यक्ती असली पाहिजे, अशी मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. मात्र, प्रवीण दरेकर हे सध्या मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना या सगळय़ातून महिन्याला साधारण अडीच लाखांचे मानधन मिळते. त्यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखविली आहे.

त्यामुळे कोट्यवधींची संपत्ती असणारे दरेकर मजूर कसे? असा सवाल सहकार विभागाने पाठविलेल्या नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे. आता प्रवीण दरेकर आपल्या मजूर असण्याचे समर्थन कशाप्रकारे करणार, हे पहावे लागेल.

Related Stories

अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांकडून जम्बो कोव्हिड सेंटरच्या कामाचा आढावा

Patil_p

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईत दाखल

datta jadhav

लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्याचे वीजबिल एकत्रित

Abhijeet Shinde

जिह्यातील 64 टक्के शाळा सुरु होण्याचा अहवाल शासनाकडे सादर

Patil_p

‘बर्ड फ्लु’च्या संकटाने व्यावसाईक धास्तावले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!