Tarun Bharat

कोडीहळ्ळी चंद्रशेखर पोलीसांच्या ताब्यात

परिवहन मंडळ कर्मचाऱयांनाही केली अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकरी व परिवहन मंडळ कर्मचाऱयांची बैठक घेण्यासाठी शनिवारी बेळगावात आलेले शेतकरी संघटनेचे नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खबरदारीची उपाय योजना म्हणून ही कारवाई करण्यात आली असून चंद्रशेखर यांना बेंगळूरला पोहोचविण्यासाठी बेळगाव पोलिसांचे एक पथक त्यांच्या सोबत गेले आहे.

सहावा वेतन लागू करावा या मागणीसाठी परिवहन मंडळ कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर करीत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सरकारने बैठका, सभा, धरणे, आंदोलने घेण्यावर निर्बंध घातले आहे. या पार्श्वभूमिवर चंद्रशेखर हे शनिवारी बेळगावला आले होते.

हॉटेल मीलनमध्ये पत्रकारांना भेटून हलगा येथील सुवर्णगार्डनमध्ये होणाऱया शेतकरी व परिवहन कर्मचाऱयांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ते जाणार होते. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी शनिवारी सकाळी चंदशेखर यांना ताब्यात घेऊन बेंगळूरला माघारी पाठविण्यात आले.

बैठकीसाठी त्यांनी परवानगी घेतली नाही असा ठपका ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान बैठकीसाठी जमलेल्या परिवहनच्या 30 हून अधिक कर्मचाऱयांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची सुटका करण्यात आली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना कोडीहळ्ळी चंद्रशेखर म्हणाले, लोकशाहीत आंदोलने दडपणे योग्य नाही. कष्टकरी वर्गाची समस्या काय आहेत हे शांतपणे ऐकून घेण्याची जबाबदारी सरकारवर असते. आम्ही भुकेले आहोत. या पगारात गुजरान करणे कठीण जात आहे. म्हणून सहावा वेतन आयोग लागून करा, असे म्हणणे चुकीचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन परिवहन मंडळाचे वाटोळे करुन याचे खासगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे, असा आरोपही चंद्रशेखर यांनी केला.

Related Stories

धनगर समाजाला विशेष पॅकेज जाहीर करा

Patil_p

शेतकऱयांना जाचक ठरत असलेला कायदा रद्द करा

Patil_p

बँकांच्या संपामुळे डिजीटल व्यवहारांना पसंती

Amit Kulkarni

तरुण भारत सौहार्द सोसायटीचे आकर्षक व्याजदर

Amit Kulkarni

अनगोळ-उद्यमबाग रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

Amit Kulkarni

निपाणीत गुटख्याचा ‘काळाबाजार’

Patil_p