वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च, केडी १४ या ट्रस्टचे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्हरंड सुमित्र शिवराम विभूते वय ८९ यांचे वार्धक्याने आज शनिवार दि. ८ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोडोलीसह कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील ख्रिश्चन जनतेतील श्रध्देचे अढळस्थान हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रेव्हरंड सुमित्र विभुते यांच्या पत्नी पाळक शांताबाई यांचे आठच दिवसापुर्वी ह्रदय विकाराच्या धक्याने निधन झाले होते. त्यापासून आपण एकटे राहिल्याच्या विरहात सुमित्र विभूते यानी अन्नवर्ज केले होते. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसें दिवस खालावत चालली होती अखेर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोल्हापूरातील खाजगी हॉस्पीटल येथे दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्याच्यावर कोडोली येथील ख्रिश्चन कब्रस्थान येथे धर्माप्रमाणे अत्यंसंस्कार करण्यात आले.
कर्नाटकातील शिरगांव गांवचे रेव्हरंड सुमित्र विभुते यांचे जुन्या काळातील सातवी पर्यन्त शिक्षण झाले होते. कोडोलीत ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चची रेव्हरंड पदाची जबाबदारी मिळाल्यापासून सलग ४५ वर्ष त्यानी कोडोलीत धर्मप्रसाराचे काम निष्ठेने केले आजवर त्यांनी ख्रिश्चन धर्मा व्यतिरीक्त अन्य धर्मातील ग्रंथाचा देखील अभ्यास त्यांना होता. शांत,संयमी, मनमिळावू व मितभाषी स्वभावाने सर्वच जातीधर्मातील जनतेचे ते श्रद्धास्थान झाले होते कोडोलीतील नाताळ यात्रेला त्यानी लौकीक मिळवून दिला धर्म प्रसाराचे काम करताना आजवर शेकडो अनुयायी त्यानी घडवले कोल्हापूर बरोबर सांगली सातारा यासह अन्य जिल्ह्यातील ख्रिश्चन साधकांना ते मार्गदर्शक होते दि. १६ जानेवारीला कोडोलीतील चर्चच्या शताब्दी सोहळ्यातील त्याचे मार्गदर्शन अखेरचेच मार्गदर्शन ठरले.


previous post