Tarun Bharat

कोडोलीतील शतकोत्तर नाताळची परंपरा यावर्षी साधेपणाने

Advertisements

कोरोना महामारी संपुष्टात येण्यासाठी प्रार्थना

वारणानगर / प्रतिनिधी

गोव्या नंतर पश्चिम महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मियांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोडोली ता. पन्हाळा येथे सन १९१९ पासून दरवर्षी सुरू असलेला नाताळ सन आज दि.२५ शुक्रवारी मोजक्या भक्तांच्या सानिध्यात भक्तिमय व शांततापूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साधेपनाने साजरा करण्यात आला.

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या चर्च मंदिरावर नाताळ निमीत्त विद्युत रोषणाई करण्यात येऊन चर्च मध्ये धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्याटप्याने सामाजिक अतंर ठेवून उत्साहात पार पडले.

सकाळी साडेनऊ व एक वाजता केसीसी,केडीसीसी चर्चच्यावतीने रेव्ह एस.आर. रणभिसे यांनी भक्ती घेतली. यावेळी जगावर आलेली कोरोना सारखी महामारी लवकरात लवकर संपुष्टात यावी,सर्वाना चांगले आरोग्य लाभावे, सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळपासून दाणार्पण करणे साठी ख्रिस्ती बांधवां बरोबर विविध समाजातील नागरिकही शासनाचे सर्व निकष पाळत पामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अन्न, धान्य, कपडे, वेगवेगळ्या वस्तू याचे दान करण्यात आले. या दानाचा रात्री लिलाव करण्यात आला.

कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या सानिध्यात आजचा ख्रिस्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला. गेली शंभर वर्षे मोठ्या उत्साहात कोडोलीत भरणारी जत्रा यावेळी भरली नाही नागरिकांनीही गर्दी न करता शासनाचे आदेशाचे काटेकोर पालन केले.

चर्चच्या मुख्य गेटला कुलूप लावल्याने बरेच भाविकानी गेट जवळून चर्चच्या इमारतीचे दर्शन घेऊन समाधान मानले. कोडोली ग्रामपंचायत प्रशासक राजेद्र तळपे, ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम तसेच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांनी नीटनेटके नियोजन करून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत हा उत्सव पार पाडला.

Related Stories

कोल्हापूर : शियेत आणखी एक पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या दहावर

Archana Banage

आमदार पी एन पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाने फेटाळला

Archana Banage

१५ जूनपर्यंत निर्बंध कायम

Archana Banage

Kolhapur; शहरातील नाले गेले कुठे ? सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका प्रशासनाला विचारणा

Abhijeet Khandekar

कंपनी व्यवस्थापकानेच लुटले मशिनरीसह सुमारे पाच लाख ऐंशी हजारांचे साहित्य

Archana Banage

समीर वानखेडे मुस्लिमच असल्याचा काझी मौलाना अहमद यांचा दावा

Archana Banage
error: Content is protected !!