Tarun Bharat

कोडोलीत घरफोडी करुन दोन लाखाचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप तोडून चोरी : परिसरात खळबळ

प्रतिनिधी / सातारा

साताऱयात कोडोतील दत्तनगरमधील भापकर चाळीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ाने सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 1 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरटय़ांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार गणपत बाळू सावंत (वय 70, रा. दत्तनगर, कोडोली, काळोशी रोड, भापकर चाळीच्या पाठीमागे, सातारा) हे त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दि. 10 ते 16 मार्चदरम्यान त्यांच्या घराला कुलूप होते. याच कालावधीत अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ही चोरी केली आहे.

या घटनेत त्यांच्या घरातील सोन्याचा लक्ष्मीहार, चेन, मोहनमाळ, अंगठी, नथ तसेच रोख रक्कम एक हजार रुपये, तीन हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. ही घटना लक्षात आल्यावर सावंत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्या. या चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.

Related Stories

शिवसागर जलाशयात शक्तीशाली बोट तैनात

datta jadhav

नऊ वर्षाची ज्ञानेश्वरी चालवतेय टेम्पो

datta jadhav

सातारा : रानडुकराच्या शिकारी प्रकरणी पिलाणीत सहा जण ताब्यात

Archana Banage

सातारा : पाटण मतदारसंघात मिळणार व्हेंटिलेटर बेड

Archana Banage

निटच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकले

Patil_p

पेट्रोल डिलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन

Patil_p