Tarun Bharat

कोडोलीत मुंबईहून आलेल्या महिलेची माहिती घेण्यास गेलेल्या आशासेविकेस शिवीगाळ

Advertisements

प्रतिनिधी/कोडोली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गाव सुरक्षित ठेवण्यासाठी घरचा सर्व्हे करण्यास गेलेल्या आशासेविकेस शिवीगाळ केल्याची घटना घडली. आशा सेविका सुषमा गायकवाड यांना राजू महापुरे यांनी अश्लील शिवीगाळ केल्यामुळे आशा सेवकांनी काम बंद आंदोलन करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पन्हाळा पंचायत सभापती गितादेवी पाटील व सरपंच शंकर पाटील यांना दिले. यानंतर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत सरपंच शंकर पाटील यांनी याप्रकारावर माफी मागून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या बाबतची माहिती अशी, येथील चोपडे गल्लीत राजू महापुरे यांचे घर आहे. राजू महापुरे यांची पत्नी मुंबई येथून आल्याची ग्रामपंचायत कोरोना दक्षता समितीला कोणतीही माहिती न देता त्या घरी आल्याची माहिती गाव सर्व्ह करणाऱ्या आशा सेविका यांना समजल्याने आशासेविका सुषमा यांनी महापुरे यांच्या घरी जाऊन मुंबई येथून आलेल्या त्यांच्यात पत्नी बद्दल माहिती घेत असताना राजू यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून उलट आशा सेविका सुषमा चोपडे यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावले होते.

या बाबत आज सर्व अशा सेविका ग्रामपंचायत कार्यालयात जमून घडलेला सर्व प्रकार पन्हाळा पंचायत समिती सभापती गीतादेवी पाटील, समाजकल्याण माजी सभापती विशांत महापुरे, सरपंच शंकर पाटील यांना सांगितले व राजू महापुरे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. जो पर्यंत महापुरे यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत गावाचा सर्व्हे होणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी राजू महापुरे, पन्हाळा पंचायत समिती सभापती गीतादेवी पाटील, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे व सरपंच शंकर पाटील यांनी गावाच्या वतीने माफी मागितल्या नंतर या गोष्टीवर पडदा पडला.

जातीवाचकचा प्रभावी वापर

जिल्ह्यात समाज कल्याणची धुरा वाहिलेले सभापती आशा सेविकांना पाठबळ देण्या ऐवजी त्यांना थोपवण्यासाठी त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जातीवाचक बाबत कारवाई होईल असा दम अशा सेविकांना भरत होता याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात दिवसभर रंगली होती.

गुन्हेगारीला आश्रय, माफी तिसरेच मागतायेत ?

आशा सेविकेला अश्लील शिवीगाळ केलेले राजू महापुरे ग्रामपंचायत मध्ये माझ चुकलय एवढेच म्हणत होते ज्याच्याकडे कडक कारवाई साठी न्याय मागितला तेच सर्वजन माफी मागत होते त्यामुळे गुन्हेगाराला ऐवढे पाठीशी घातले जात होते याची चर्चा सुरू होती तथापी अशा मुस्कटदाबीमुळे आशा सेविका कोरोना बाधितांची किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती घेण्यास पुढे येणार नाहीत यासाठी याप्रकरणी कारवाई होण्याची मागणी होत आहे.

Related Stories

कोल्हापूर : १५ व्या वित्त निधी वाटपाबाबत दुसरी याचिका दाखल

Abhijeet Shinde

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच

Patil_p

बदलापूरच्या एका कंपनीत रासायनिक गॅसगळती; अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

Rohan_P

स्वराज्यच्या बोधचिन्हासाठी संभाजीराजेंचं जनतेला आवाहन

Abhijeet Shinde

नानीबाई चिखली, हमीदवाड्य़ातील भूखंडधारकांना मिळणार मालकीपत्रे

Abhijeet Shinde

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा शपथविधी संपन्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!