माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून तेथील सेवा सुधाराव्यात यासाठी प्राधान्य देण्यासाठी योग्य ती कार्यपूर्ती करावी असे पत्र राज्याचे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यानी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.
राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रभाव वाढत असून विषाणूचे संक्रमण दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना सणांची संख्या वाढत आहे. तसेच इतर अजाराच्या कारनाने देखील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात तसेच अजार बळावल्याने उपचारास आतंररूग्ण विभागात दाखल असतात यांना पुरेशा सेवा सुविधा मिळत नसल्याची माहिती देखील हंडोरे यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.
कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक यंत्र सामग्री,ऑक्सीजन व्हेटींलेटर, उपलब्ध करावेत तसेच औषधांचा मोठ्या प्रमाणात तूरवडा भासत असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो पुरेसा औषध साठा देखील उपलब्द करावा अशी मागणी देखील जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिलेल्या पत्रात केली आहे.