Tarun Bharat

कोडोली पोलीस ठाण्याच्या वाहनात सातत्याने बिघाड, नव्या वहानाची गरज

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली पन्हाळा येथील पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या चार चाकी गाडीचा सातत्याने बिघाड होत असून या गाडीची मोठी दुरवस्था झाली असून नवे वहान देण्याची मागणी होऊ लागली आहे.

पोलीस गाडीत सातत्याने ‘ बिघाड होत असल्याने पोलिसांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
कोडोली पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र सव्वीस गावासह वाड्या वस्त्याचे असुन निम्यापेक्षा अधिक गावे डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे या गावात घटना घडलेस गाडीतुन जाण्यास अडथळा येत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावे संवेदनशील असल्याने या गावात एखादी घटना घडल्यास रात्री अपरात्री तातडीने गाडीतुनच पोलिसांना जावे लागत आहे त्यास विलंब होत आहे.

तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दी मध्ये खुप, दरोडे, घरफोडी, अपघात, हाणामारी अशा घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांना या चार चाकी गाडीतुन तातडीने पोहचण्याची गरज लागते. रात्रीच्या वेळी गस्त घालणे, गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे तसेच आरोपींना ने आण करणे इत्यादी कामा करीता या गाडीचा पोलिसांना  सातत्याने उपयोग करावा लागत आहे.

सद्या गाडीच्या इंजिनमध्ये  वारंवार बिघाड, अॅक्सल तुटने, वायरिंग मध्येदोष निर्माण होणे,बॅटरी डाऊन होणे, गाडी ढकलून चालु करावी लागणे त्याचबरोबर गाडीची संपूर्ण  बॉडी सडलेली असल्याने पावसाचे पाणी गाडीमध्ये साचून राहत आहे. त्यामुळे या गाडीलाच पोलिस वैतागले आहेत. ही गाडी बरीच वर्षा पूर्वीची असल्याने शासन नियमाने या गाडीचे आयुष्य संपले असावे गाडीच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च करण्यापेक्षा नवीन गाडी देण्याची गरज असून तशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

Related Stories

जवान विनय भोजे यांच्यावर तिळवणी येथे अंत्यसंस्कार

Sumit Tambekar

‘आक्रोश महामोर्चा’द्वारे शासनाचा निषेध

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रिक्षाने ठोकली धूम

Abhijeet Shinde

जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्या भावाचा बहिणीवर विळ्याने हल्ला

Abhijeet Shinde

तलाव ठेका रक्कम भरण्यास मे अखेरपर्यत मुदतवाढ

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!