Tarun Bharat

कोडोली येथे मगरीचे दर्शन : कापरे वस्तीत घबराट

वार्ताहर / वारणा, कोडोली

बोरपाडळे – वाठार राज्य मार्गावर कोडोली ता. पन्हाळा येथील असणाऱ्या नरसोबा ओढ्यातील पात्राबाहेर मगरीचे दर्शन झाल्याने ओढ्या जवळच असलेल्या कापरे वस्तीत घबराट निर्माण झाली आहे.

कोडोलीतील नरसोबा ओढा रूंद पात्राचा मोठा आहे अलिकडील काळात या ओढ्यात अतिक्रमण व झाडे झुडपाच्या विळख्यात या ओढ्यातील पात्र अरूंद झाले आहे नरसोबा ओढ्यावरील असणाऱ्या पुलाजवळच दक्षिण बाजूच्या काठावर हेमांड पंथी श्री.नृसिंह मंदीराचा परिसर आहे तर उत्तर बाजूच्या काठावर कापरे वसाहत आहे.

ओढा पात्रात आज मगर दिसल्याने जवळच असलेल्या कापरे वसाहतीस तसेच या मार्गावर ये – जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला असून वन विभागाने शोध मोहीम राबवून मगरी पकडण्याची मागणी होत आहे.

Related Stories

शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी

Archana Banage

ऑक्सिजन प्लॅंट जलदगतीने उभे करा

Archana Banage

येत्या चार वर्षात कोल्हापूर आघाडीवर : पालकमंत्री

Abhijeet Khandekar

जी.डी.सी.अॅण्ड ए परीक्षा 23 ऑक्टोबर पासून

Archana Banage

राज्यातील सत्तांतराचा शाहू गौरव ग्रंथाला फटका

Archana Banage

सेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलींद भोसले

Abhijeet Khandekar