Tarun Bharat

कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा

Advertisements

ऑनलाईन टीम / दौंड :

दौंड येथे चोरटय़ांनी सिग्नलची वायर कापून कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दौड जवळील मानवी फाटय़ाजवळ मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दौड रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

विनायक श्रीराम (वय 27, रा. सोलापूर) असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोणार्क एक्सप्रेस रात्री साडेसात वाजता पुणे स्टेशनवरुन सुटली. रात्री पावणे नऊच्या सुमारास ती नानजीव फाटा येथे आली. या ठिकाणी दरोडेखोरांनी सिग्नलची वायर कापल्याने रेल्वे थांबली. त्यावेळी आंधाराचा फायदा घेत तीन चोरटय़ांनी एस 4 या डब्यात खिडकीत बसलेल्या दोन महिलांच्या गळय़ातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. तसेच बहिणीची सोनसाखळी चोरणाऱ्या या चोरटय़ांना पकडण्यासाठी खाली उतरलेला विनायक हा चोरटय़ांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला. यांच्यावर दौड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली.

Related Stories

शिव्या देणे, ही कोल्हापूरची वा महाराष्ट्राची संस्कृती नाही

datta jadhav

पुणे : नामांकित महाविद्यालयाजवळ सराईताकडून एक कोटींचे अमली पदार्थ जप्त

datta jadhav

पुराणे ही जीवनाला स्वर्ग करण्यासाठीचे माध्यम

Tousif Mujawar

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

Archana Banage

धक्कादायक! नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगरीतून औरंगाबाद,जालन्यात विषबाधा; दोन्ही जिल्ह्यात ३७ जण बाधित

Archana Banage

विरोधकांना २०२४ मध्ये उमेदवार शोधावे लागतील ; चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत

Archana Banage
error: Content is protected !!