Tarun Bharat

कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही – ऊर्जामंत्री

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

कोरोनामुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे अर्थिक गणित कोलमडले आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे शेतकऱ्याला वीज बिलातुन दिलासा मिळावा यासाठी त्या आशयाची मागणी केली होती. यातुन मंत्री राऊत यांनी ही शेतकऱ्यांसाठी हितावह निर्णय घेतले ही. मात्र पुर्ण वीज बील माफ करण्यासाठी साफ नकार दिला.

याच पार्श्वभुमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ ? असा सवाल ही सवाल उर्जामंत्री राऊत यांनी विचारला.

“आधीच अतिवृष्टी झाली. शासनाने त्याच्या मोबदल्यात ५-७ हजार रुपये दिलेत. त्यातही आता महावितरण बिल भरण्याची सक्ती करत आहे. पैसे नसताना बिल कसं भरायचं”, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लोक मुदत देण्याची मागणी करत आहे. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, “वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर करत असाल तर वीजेचं बिल तुम्हाला भरावंच लागेल. महावितरण वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कुणी फुकटात वीज देत नाही. वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा घ्यावा लागतो. त्यांना बँकांचं कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा द्यावा लागतो.”

Related Stories

धक्कादायक! गाडी थांबवायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच नेले फरफटत

Tousif Mujawar

वाडिया रुग्णालय निधी प्रकरण :

datta jadhav

भारतात कोरोनाबाधितांनी गाठला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav

महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घरात बसून देण्यास राज्यपालांची परवानगी : उदय सामंत

Tousif Mujawar

काँग्रेसच्या प्रयत्नांमुळं चित्ते भारतात; बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत सांगितला घटनाक्रम

Archana Banage

पालिका कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान द्या

Patil_p