Tarun Bharat

कोतवालास शंभर रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रतिनिधी / उस्मानाबाद

शंभर रुपयांची लाच मागणी करून शंभर रुपये लाच रक्कम स्विकारल्याने कोतवाल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी घेतले ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांना कोर्ट कामकाजसाठी लागणाऱ्या 1992 मधील फेरची नक्कल देणे संदर्भाने दस्तऐवज शोधाण्यासाठी लोकसेवक नामे दत्तात्रय माणिक तिगाडे , वय 38 वर्ष व्यवसाय नोकरी – कोतवाल, सज्जा बेंबळी सध्या कामकाज अभिलेख कक्ष, तहसील कार्यालय उस्मानाबाद यांनी तक्रारदार याना शंभररुपये लाच राकमेची मागणी करून शंभर रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. याबाबत पोस्टे आनंद नगर उस्मानाबाद , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफतेकार शेख, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, विशाल डोके यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी / कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टसह चौघे पॉझिटिव्ह

Archana Banage

गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 20 बांगलादेशींना अटक

Abhijeet Khandekar

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Archana Banage

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २६ मे रोजी निदर्शने

Archana Banage

यंदा 27 तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात..

Kalyani Amanagi

इचलकरंजीत ऑनलाईन मटका अड्ड्यावर छापा ; मालकासह दोघांना अटक

Archana Banage