Tarun Bharat

कोतवाल गल्ली येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसामुळे कोतवाल गल्ली येथील एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही.

मैनुद्दीन कोतवाल यांच्या स्वयंपाक घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. फ्रिज, कपडे, भांडीकोंडी, गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले असून या घटनेत सुमारे दीड लाखांची हानी झाल्याची माहिती मैनुद्दीन यांनी दिली. भिंत कोसळल्याने मैनुद्दीन यांचे कुटुंबिय संकटात सापडले आहेत.

ही घटना घडली त्यावेळी मैनुद्दीन व त्यांची पत्नी दोघेच घरात होते. हे दांपत्य दुसऱया खोलीत झोपले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भिंत पडल्याचा आवाज आला. त्यामुळे दांपत्याला खडबडून जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता स्वयंपाक घरात भिंत कोसळल्याचे निदर्शनास आले.

Related Stories

रेल्वेमार्गाला शेतकऱयांचा का आहे विरोध?

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये प्रेमचंद जयंती साजरी

Amit Kulkarni

प्रसिद्ध के सिरीज मालिकांचा दिग्दर्शक बेळगावचा

Patil_p

निजगुणानंद स्वामीजींसह पुरोगामींना धमकीचे पत्र

Patil_p

महिला विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वितरण

Amit Kulkarni