Tarun Bharat

कोथिंबीर महागली, टोमॅटो स्वस्त

Advertisements

काही भाज्या वगळता इतर भाजीपाला दरात वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी होत असल्याने पुन्हा भाजीपाल्यांचे दर वाढत चालले आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत काकडी, कारली, कोथिंबीर, ओली मिरची, भेंडी, दोडकी आदी भाज्यांच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. मागील आठवडय़ात 5 रुपये पेंढी असणारी कोथिंबीर आता 20 रुपये झाली आहे. याबरोबर खाद्यतेलाचे दरदेखील भडकले आहेत.

किरकोळ बाजारात शनिवारी काकडी 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, बिन्स 40 रु. किलो, कोथिंबीर 20 रु. पेंडी, ढबू 70 रु. किलो, गाजर 40 रु. किलो, हिरवा वाटाणा 50 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 20 रु. पेंडी, नवलकोल 10 रुपयाला 4, फ्लॉवर 10 रु. एक, कोबी 20 रु. एक, टोमॅटो 15 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, लालभाजी 20 रुपयाला दोन पेंडय़ा, कांदापात 20 रुपयाला पाच पेंडय़ा, मेथी 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन पेंडय़ा, पालक 10 रुपयाला दोन पेंडय़ा तर लिंबू 10 रुपयाला तीन नग याप्रमाणे विक्री सुरू होती.

किरकोळ बाजारात कोबी, फ्लॉवर, नवलकोल, टोमॅटो, लालभाजी, कांदापात, मेथी, पालक आदी भाज्यांचे दर आवाक्मयात असले तरी कारली, ढबू, वांगी, काकडी, बिन्स आदी भाज्यांचे दर चढेच आहेत. पालेभाज्यांचे दर कमी असले तरी इतर भाज्यांचे दर अधिक आहेत. दरम्यान विविध ठिकाणी यात्रांना प्रारंभ झाल्याने भाजीपाला खरेदी मंदावली आहे. विशेषतः ओल्या मिरचीचा भाव अधिक आहे.

मागील पंधरा दिवसांत दोनवेळा खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. रशिया-युपेन युद्धामुळे दोन दिवसांत तब्बल 15 किलोच्या डब्यामागे 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तेलाचा चटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्यांची मागणी वाढली आहे. मात्र आवक कमी कमी होत असल्याने भाजीपाल्यांचे दर देखील वाढत आहेत. काही भाज्या वगळता भाजीपाला 50 ते 60 रुपये किलो झाला आहे.

Related Stories

पीओपीबाबत प्रशासनाने धोरण जाहीर करावे

Patil_p

बेळगाव-धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर होणार जमिन संपादन

Patil_p

भारतीय संगीताला महान इतिहास

Patil_p

उचगाव येथील शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

Omkar B

ओएमआरद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती

Patil_p

…तितके उपचार सुलभ होतील!

Amit Kulkarni
error: Content is protected !!