Tarun Bharat

कोपार्डे देवस्थानच्या न्हावणोत्सव मिरवणूक, दिंडी, पारंपरिक वादनाने ठरली आकर्षक

वाळपई / प्रतिनिधी

गोव्यातील जागृत देवस्थान म्हणून समजल्या जाणाऱया सत्तरी तालुक्मयातील कोपाडे श्री ब्राह्मणी महामाया देवस्थानचा पारंपरिक शिगमोत्सव हा आगळावेगळा होत असतो. पारंपरिक उत्सवाची सांगता न्हावणोत्सवाने करण्यात आली. यावेळी प्रचंड प्रमाणात भाविक व नागरिकांनी गर्दी केली होती.

सत्तरी तालुक्मयातील कोपार्डे येथील श्री ब्राह्मणी महामाया देवस्थान हे गोमंतकातील त्वचारोगावर तीर्थस्थान म्हणून ओळखले जात अआहे. या देवस्थानचा पारंपारिक उत्सव वेगवेगळय़ा पद्धतीने साजरा करण्यात येत असतो. एकूण पाच दिवशीय शिमगोत्सवात चोर उत्सव, करवल्या घोडेमोडण ,पालखी उत्सव अशी वेगवेगळी पारंपारिक उत्सव साजरा करण्यात येत असतात. यंदाही शेकडो वर्षाची परंपरा जपत पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला.

सुरुवातीला होळी पूजनाने याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चोर उत्सव, घोडेमोडणी रोमाट, पालखी वेगवेगळे पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आले. या महोत्सवाची सांगता सुप्रसिद्ध असलेल्या न्हावणोत्सवाने झाली. यावेळी देवस्थानचे सर्व कळस पारंपरिक उत्सव साजरा करण्यासाठी नेले होते. यावेळी मंदिरामध्ये परतत असताना मोठी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. पारंपरिक उत्सव यामुळे यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वादन व वेगवेगळय़ा जयघोषाने ही मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी यंदाच्या देवस्थानचे पुजारी प्रकाश बारकेलो सावंत हे होते. त्याचप्रमाणे यामध्ये यंदाचे चौगुले (मानकरी) यांचा सहभाग होता.

हा आगळा वेगळा नवीन उत्सव पाण्यासाठी भावीक व नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे ज्यामार्गाने  ही मिरवणूक जात होती त्या पूर्णमार्गवर रांगोळीचे वेगवेगळे कलाप्रकार सादर करण्यात आले होते. संध्याकाळी उशिरा ही मिरवणूक गावात परतल्यानंतर गावातील ग्रामस्था?नी धार्मिक पद्धतीने त्याचे जोरदार स्वागत केले.

शेकडो वर्षांपासून ही परंपरा रूढ झालेली आहे. या पारंपरिक उत्सवांमध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणले असले तरी याची पारंपरिक व धार्मिक पद्धतीला कोणत्या प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेण्यात येत असते. गेल्या काही वर्षापासून या गावातील तरुणाई मोठय़ा प्रमाणात या मिरवणुकीमध्ये सहभागी होते. त्यामुळे या मिरवणुकीला एक विशेष प्रकारचे आकर्षण निर्माण होत असते.  दरवषी या उत्सवाचे स्वरूप वाढत असल्याचे ज्ये. नागरिकांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Related Stories

आरजी गोव्याच्या युवकांना ‘जॉब ट्रेनिंग’साठी बंगळूरला पाठवणार

Amit Kulkarni

वाडे – कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेकडून काजू खरेदीस प्रारंभ

Omkar B

दुसऱया दिवशीही सुरस मैफलींचा रसास्वाद

Amit Kulkarni

डय़ुरँड स्पर्धेत आज बेंगलोर एफसी-एफसी गोवा उपान्त्य लढत

Amit Kulkarni

‘खोला मिरचीचा’ दर यंदा भरमसाठ वाढला

Amit Kulkarni

मास्क न वापरणाऱया मुख्यमंत्र्यांनाही अटक करावी

Omkar B