Tarun Bharat

कोमल गोडसेंच्या निधनाने हळहळली सातारकरांची मने

युवापिढीने केला कार्याला, जिद्दीला सलाम : अनेक गरजूंना गोडसेंनी केली होती मदत

प्रतिनिधी/ सातारा

’कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’च्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या कोमल धीरज गोडसे (पवार) यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्या उपचारासाठी हैदराबाद येथे गेल्या होत्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारा शहरातील युवावर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुमारे तीन वर्षांपर्वी कोमल यांचे ह्रदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्या पूर्ववत जगण्याचा आनंद घेऊ लागल्या होत्या. केवळ अवयवदानामुळे पुनर्जन्म लाभल्याची जाणीव त्यांच्या मनात होती, म्हणूनच पुन्हा अशी वेळ कुणावर येऊ नये व आली तर मदत व्हावी, या हेतूने त्यांनी साताऱयात ’कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’ची स्थापना केली होती. 

शरीरातील एकेका अवयवांचे कार्य वेगळे जगण्याचा आनंद देणारे असते. अवयवाचे महत्त्व आगळे असते, स्वतःसाठी आणि दुसऱयासाठीही! हेच कोमल यांच्यावरील शस्त्रक्रियेने सिद्ध केले. कोमल आणि धीरज हे आपल्या फाउंडेशनमार्फत अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी जागृती करीत राहिले. कोमल यांनी गरजू रुग्णांना मदत देखील केली होती. तिच्या निधनाचे वृत्त कळताच साताकरांची मने हळहळली. सोशल मिडियावर तिचे छायाचित्र टाकून तिच्या जिद्दीला व कार्याला युवापिढी सलाम करत होती.

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 33,000 रुग्ण कोरोनामुक्त; 184 मृत्यू

Tousif Mujawar

नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी

Archana Banage

आमदार भारत भालके अनंतात विलीन

Archana Banage

१८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादीच नाही

Archana Banage

कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

Archana Banage

पोलिसांच्या मदतीने बँके बाहेरील गर्दी हटली

Patil_p