Tarun Bharat

कोयना कोव्हिड सेंटर दोन दिवसांत सुरू होणार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली पाहणी

वार्ताहर/ कराड

कराड शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असताना रुग्णांना  वेळेत उपचार मिळावेत यासाठी डॉ. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून 30 ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. टाऊन हॉलसमोर जनता बँकेच्या शेजारी हे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व केसे येथील जे.डी. पाटील व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या संकल्पनेतून डॉ. प्रवीण पाटील यांनी उभारलेल्या कोव्हिड सेंटरची पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी जे. डी. पाटील, नामदेव पाटील, डॉ. प्रवीण पाटील उपस्थित होते. तीस ऑक्सिजन बेड असलेल्या या कोव्हिड सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. दोन दिवसांत हे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

कराड तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या प्रमाणात रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून स्व. यशवंतराव बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण पाटील यांनीही 30 बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. दोन दिवसांत हे कोव्हिड सेंटर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सातारच्या लेकीकडून ‘हिरकणी’ कडा सर

Patil_p

लाखोंच्या पोशिंदा बळीराजाला ओळख कोण देणार ?

Patil_p

प्रतापगडाच्या बुरुजाची तटबंदी विक्रमी पावसातही अभेद्य

Patil_p

महाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा पुण्यात रंगणार

Patil_p

नोकरी टिकवण्यासाठी लाच घेऊ नका

Patil_p

खासदार उदयनराजे यांची केंद्रीय आरोग्य मंत्रांशी चर्चा

Patil_p