Tarun Bharat

कोयना धरणक्षेत्रात भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / सातारा : 

पाटण तालुक्यातील कोयना धरणक्षेत्रात भूकंपाचे दोन वेळा धक्के जाणवले. दुपारी 3.21 मिनिटांनी पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.00 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर 3.33 वाजता दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपानंतर या परिसरात काही काळ घाबराट निर्माण झाली होती. 

या भूंकपाचा केंद्रबिंदू धरणापासून 20 किमी अंतरावर असलेल्या वारणा खोऱ्यातील चिखली या गावाच्या सात किलोमीटरअंतरच्या पूर्वेला होता. पहिल्या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 16 किलोमीटर तर दुसऱ्या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 15 किलोमीटर अंतरावर नोंदवली गेली. त्यामुळे या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले.

Related Stories

अजितदादा-शिवेंद्रराजेंच्यात गुप्तगू

Patil_p

पोलिसांना फक्त चारच विक्रेते सापडले कसे ?

Archana Banage

रयतचा आय.बी.एम.शी करार व्हावा

Patil_p

Satara : रेल्वे स्टेशन जवळ सापडला एका इसमाचा मृतदेह

Abhijeet Khandekar

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक खर्च सादर न केल्यास कारवाई

Archana Banage

महिला कुस्तीगिरांच्या खुराकासाठी खा.कोल्हे धावले

Archana Banage