तर ४१ टीएमसी पाण्याचा विसर्ग, धरणाची १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता
नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात धुवांधार कोसळलेल्या संततधार पावसामुळे जून पासून अवघ्या ६५ दिवसांत कोयना धरणात तब्बल १०५.०५ टीएमसी इतक्या प्रचंड पाण्याची आवक झाली. तर, धरणातून ४१ टीएमसी इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात जून पासून म्हणजे केवळ ६५ दिवसात पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या पावसामुळे तब्बल १०५.०५ टीएमसी इतक्या प्रचंड पाण्याची आवक झाली आहे. तर साडे चार टीएमसी पाण्याचा विसर्ग पायथा विजगृहातून आणि साडे छत्तीस टीएमसी पाण्याच्या विसर्ग सहा वक्र दरवाजा मधून असे मिळून एकूण ४१ टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.
धरणात ८८.९६ टीएमसी पाणीसाठा
शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत कोयनानगर येथे ११ (३३८५) मिलिमीटर नवजा येथे ७ (४३१२) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ९ (४३९८)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणात प्रतिसेकंद २हजार १०० क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ८८.९६ टीएमसी इतका झाला असून पाणीपातळी २१५० फूट १० इंच इतकी झाली आहे.

