Tarun Bharat

कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा 9 मे पासून

Advertisements

सेऊल

 कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धेला 9 मे पासून प्रारंभ केला जाणार आहे. 2020 च्या फुटबॉल हंगामाला के लीग फुटबॉल स्पर्धेने 8 मे पासून सुरूवात होत आहे. कोरोना महामारीमुळे कोरियातील फुटबॉल हंगामाला विलंब झाल्याचे कोरियन फुटबॉल संघटनेतर्फे सांगण्यात आले. कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा यापूर्वी 14 मार्च रोजी होणार होती. या स्पर्धेतील प्राथमिक फेऱयातील काही सामने प्रेक्षकविना खेळविले जाणार आहेत.

 पहिल्या फेरीत 32 संघांचा समावेश राहील. कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने 29 जुलैपासून तर उपांत्य फेरीचे सामने 28 ऑक्टोबर रोजी घेतले जातील. कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणाखाली आणण्यामध्ये यश मिळविणारा दक्षिण कोरिया पहिला देश आहे.

Related Stories

किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आजपासून

Patil_p

आयसीसीकडूनही गंभीर दखल, घटनेचा तीव्र निषेध

Patil_p

आगामी आयपीएल स्पर्धेत दोन नव्या संघाचा सहभाग

Patil_p

पिंकीची लढत आता कांस्यपदकासाठी

Patil_p

वॉर्नर, मॅथ्यूज महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p
error: Content is protected !!