Tarun Bharat

कोरेगावचे वाटोळे करणाऱयांना जनता हद्दपार करणार

आमदार महेश शिंदे यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

प्रतिनिधी/ सातारा

ज्यांनी कोरेगाव मतदार संघात भष्ट्राचार केला, तसेच मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांना जनता निश्चितपणे हद्दपार करेल. जिह्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडी तोडली, त्यामुळे आम्ही कॉंग्रेसला सोबत घेऊन वाटचाल करत आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत मंगळवारी ओबीसीच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रप्रिया झाली. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला.

 गेल्या दोन वर्षात केलेली प्रचंड कामे, कोरेगाव शहरात केलेली कामे पाहता या नगरपंचायतीत परिवर्तन होणार आहे. पहिल्यांदा महाविकास आघाडी राष्ट्रवादीने तोडली. जिल्हा बंकेच्या निवडणुकीत शिवसेनेने जिह्यात दोन जागा मागितल्या होत्या. त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलले. त्यांनी डावलूनही आम्ही तीन जागा निवडून आणल्या. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हाला बरोबर घेणार असतील तर, आम्ही आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे यापुढे शिवसेना कॉंग्रेसला बरोबर घेवून वाटचाल करत आहोत. यापुढेही वाटचाल करत राहणार आहोत.

चौकट  जे जनतेते राहतात, जनतेचे प्रश्न सोडवितात, पाच वर्षे जनतेसाठी झटणाऱयांना जनतेची सहानुभुती मिळते. मी महायुतीतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. अजूनही आमचे पक्ष तसेच आहेत. काही ठिकाणी शिवसेना तर काही ठिकाणी सहयोगी पक्ष असे आम्ही एकत्र लढत आहोत. कोरेगाव विकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून काम करत असून आम्ही निश्चित परिवर्तन घडवू असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

datta jadhav

सैनिकांच्या जिल्हय़ाचा मान राखा

Patil_p

सातारा : वाळूच्या कारणातून नरवणेत दोघांचा निर्घृण खून

datta jadhav

नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांची कोरोनावर मात

Archana Banage

सातारा : आसलेतील युवकाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

datta jadhav

पुढील तीन दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Patil_p
error: Content is protected !!