Tarun Bharat

कोरोची येथील युवकाचा निर्घृण खून

प्रतिनिधी / इचलकरंजी

येथील तारदाळ हद्दीलगत असलेल्या प्राईड इंडिया पार्कच्या सांगले मळ्यातील पानंद रस्त्यावर एका चाळीस वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव संदीप घट्टे असुन तो कोरोची तालुका हातकणंगले येथील रहिवाशी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.हल्लेखोरांनी चेहऱ्यावर अनेक वार करुन मृत व्यक्तीचा चेहरा विद्रुप केला होता. हा खून मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

इचलकरंजी लगत असलेल्या तारदाळ प्राईड इंडिया पार्क या नावाने औद्योगिक वसाहत आहे. या वसाहती लगत सांगले मळा पाणंद रस्ता परिसरात आज पहाटे कामगार कामावर जात असताना एका युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.चेहरा विद्रूप झाल्याने मृत युवकाची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. पोलिसांनी तातडीने याबाबत तपास सुरू केला असता हा युवक कोरोची येथील पानपट्टी चालक असल्याचे पुढे आले. व्यावसायिक स्पर्धेतून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली .दरम्यान गेल्या आठवड्यात जवाहरनगर सारख्या इचलकरंजी शहरातील एका महत्त्वाच्या भागात युवकाचा खून झाला होता त्यानंतर लगेचच आज दुसरा खून झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Related Stories

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार

Archana Banage

कोल्हापूर : उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

Archana Banage

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धाचा मृत्यू, नवे रूग्ण 15, कोरोनामुक्त 5

Archana Banage

Kolhapur; उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच दिल्लीला- खासदार मंडलिक

Abhijeet Khandekar

राजर्षी शाहू महाराज अन् सर विश्वेश्वरय्या !

Archana Banage

मानधन न मिळाल्यास मंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन

Abhijeet Khandekar